मुंबई : मुंबईत झाडांची संख्या वाढल्याचा दावा मुंबई महापालिका करत असली तरी काही वॉर्डात पारंपरिक झाडांपेक्षा जपानी मियावाकी झाडांची संख्याच जास्त असल्याचे स्पष्ट होत आहे. मियावाकी झाडे पाच ते सहा महिन्यांत वाढतात, त्यांची उंची जेमतेम चार ते पाच फूट असते. त्यामुळे या झाडांची आकडेवारी जमेस धरून मुंबईत झाडे वाढल्याचा दावा कसा करता येईल, असा प्रश्न जाणकार विचारत आहेत.
गेल्या दशकभरात मुंबईत ११ लाख झाडे वाढल्याचा पालिकेचा दावा आहे. के-पूर्व भागात पालिकेने मागील पाच वर्षांत २,४४३ झाडे लावली. वृक्ष लागवडीचा वेग हा सरासरी पाच हजार झाडे इतका हवा होता. हा आकडा गृहीत धरला तरी २४ वॉर्डांत मिळून गेल्या दशकभरात १ लाख २० हजार झाडे लावण्यात आली. असे असताना ११ लाख झाडे लावल्याचा दावा पालिका कोणत्या आधारे करत आहे, असा सवाल वॉचडॉग फाउंडेशनचे गॉडफ्रे पिमेंटो यांनी केला. वृक्ष लागवडीबाबतची माहिती त्यांनीच माहितीच्या अधिकारातून मिळवली आहे.
पारंपरिक व मियावाकी झाडांची तुलना अशक्य -
१) मुंबईत झाडांची संख्या वाढली असली तरी काही विभागात पारंपरिक झाडांपेक्षा मियावाकी झाडांची संख्या जास्त असल्याचे माहितीतून स्पष्ट होत आहे.
२) या झाडांची आणि आपल्या पारंपरिक झाडांची तुलना अशक्य आहे. मियावाकी झाडांच्या आधारे एकूण झाडांची संख्या वाढली असे कसे म्हणता येईल,
वॉर्ड पारंपरिक मियावाकीझाडे झाडेएम १,३७८ १५,६५०एम-पश्चिम १,७५५ १,२०,३८३एम-पूर्व ४,२७३ -एल - ५९,८१७के-पूर्व २,५६५ ३६,२१०पी-दक्षिण ८,२०६ ९,१२५आर-सी ५,१३७ ९,३००एस २,८०४ २६,८६०टी ४,८४८ ५२,२००