Join us

रुग्णालयात खाटांबरोबर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा; म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 10:09 AM

पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पालिकेने सर्व रुग्णालयांमध्ये सायंकाळीही बाह्यरुग्ण विभाग सुरू केला आहे.

मुंबई : पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पालिकेने सर्व रुग्णालयांमध्ये सायंकाळीही बाह्यरुग्ण विभाग सुरू केला आहे. याबरोबरच आता खाटांची संख्याही वाढवली जाणार आहे. या उपाययोजना स्वागतार्ह असल्या यातरी त्यासाठी पुरेसा कर्मचारीवर्ग नेमावा, रिक्त भरावीत, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने आयुक्तांकडे केली.

डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना आळा घालण्यासाठी पालिका 'फिव्हर ओपीडी', वॉर रूमची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये २४ तास तसेच संलग्न रुग्णालयांमध्ये सायंकाळी बाह्यरुग्णसेवाही सुरू केली जाणार आहे. पावसाळी आजारांवरील उपचारांसाठी प्रयोगशाळांची संख्याही २० वरून ८०० एवढी वाढविण्यात येणार आहे.

'ते' कर्मचारी अद्याप सेवेत रुजू नाहीत-

कर्मचाऱ्यांअभावी पालिकेवर मोठ्या प्रमाणात भार पडतो आहे. मध्यंतरी मराठा आरक्षण सर्वेक्षण आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पालिका कर्मचारी नियुक्त केले होते.

निवडणूक कामासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचारी अद्याप सेवेत रुजू झालेले नाहीत. पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव असल्याने अतिरिक्त मनुष्यबळाची मनष्यबळा आवश्यकता भासते. कमी मनुष्यबळामुळे प्रशासनाची कसरत सुरू आहे.

५२ हजार २२१ शेड्युल पदे रिक्त-

१) रुग्णालयांमध्ये तीन हजार खाटांची व्यवस्थाही केली जाणार आहे. या उपाययोजना करण्यासाठी कर्मचारीवर्ग आवश्यक आहे.

२) पालिकेच्या प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये विविध संवर्गाची अनेक पदे रिक्त आहेत.

३) संपूर्ण पालिकेत सरळसेवेची व पदोन्नतीची ५२ हजार २२१ शेड्युल पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णसेवा देताना कार्यरत कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची भरती करणे आवश्यक आहे.

४) त्यादृष्टीने कर्मचाऱ्यांची भरती करावी, अशी मागणी युनियनचे अध्यक्ष बाबा कदम, उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे - बापेरकर यांनी केली आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाहॉस्पिटल