Join us

दूरस्थ पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात; या तारखेपर्यंत अर्ज करा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 10:40 AM

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

मुंबई :मुंबईविद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी २२ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहे.  

पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रथम सत्राचे प्रवेश विद्यापीठाच्या सीडीओईमध्ये होणारे पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रथम सत्राचे प्रवेश हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी एमए इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क, एम.कॉम अकाउंट्स, एम. कॉम. व्यवस्थापन, एमएससी गणित, एमएससी माहिती तंत्रज्ञान, एमएससी संगणकशास्त्र या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू झाले. विद्यार्थ्यांना https://mucdoeadm.samarth.edu.in या संकेतस्थळावरून अर्ज सादर करता येतील, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

एमए शिक्षणशास्त्रचे प्रवेश-

१) पदव्युत्तर प्रथम वर्षासाठीचे एमए शिक्षणशास्त्रचे प्रवेश आणि द्वितीय वर्ष एमए इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क एम. कॉम अकाउंट्स, एम कॉम. व्यवस्थापन, एमएससी गणित, एमएससी माहिती तंत्रज्ञान, एमएससी संगणकशास्त्र या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांसाठी ९ ऑगस्ट ते २२ ऑगस्टदरम्यान अर्ज करता येतील. 

२)  पीजीडीएफएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश ही याच कालावधीत केले जाणार आहेत. 

या दोन्ही अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज https://idoloa.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरून भरता येतील.  ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, ज्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी दूरस्थ व ऑनलाइन शिक्षणप्रणाली एक योग्य पर्याय आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन सीडीओईचे संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी केले आहे. 

द्वितीय वर्षाचे प्रवेश-

पदवीच्या द्वितीय वर्ष बीए. बीकॉम, बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीएससी (माहिती तंत्रज्ञान), बीएस्सी (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ९ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा तपशील https://mu.ac.in/distance-open-learning या येथे मिळणार साहित्य चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी आणि सावंतवाडी येथे सीडीओईची विभागीय केंद्रे आहेत. येथे प्रवेशासंबंधी मार्गदर्शन आणि अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. 

टॅग्स :मुंबईविद्यापीठविद्यार्थी