आयटीआयची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर; १ लाख ९६ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज अंतिम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 11:22 AM2024-07-09T11:22:43+5:302024-07-09T11:26:02+5:30
आयटीआय गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्ज कमी आले आहेत.
मुंबई : राज्यात दीड लाखांहून अधिक जागा असलेल्या शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत ऑगस्ट २०२४ मधील सत्रासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत १ लाख ९६ हजार ४८ विद्याथ्यांचे अर्ज अंतिम झाले आहेत. या विद्यार्थ्यांची प्रवेशाची यादी १४ जुलै रोजी जाहीर होणार आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या चार फेऱ्या होणार आहे. या काळात अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीत सहभागी होण्यासाठी १७ जुलैपासून संधी मिळणार आहे.
यंदा १७ हजार अर्ज घटले-
आयटीआय गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्ज कमी आले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत अर्जाची १७ हजारांनी अर्ज कमी आले आहेत. गेल्यावर्षी २ लाख १८ हजार अर्ज अंतिम झाले होते.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने राज्यभरात असलेल्या आयटीआय अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर केली. हरकती, सूचना आल्यानंतर रविवारी अंतिम यादी जाहीर करण्यात आली.
समुपदेशनासाठी १७ जुलैपासून अर्ज-
१) समुपदेशन फेरीसाठी १७ जुलै पासून अर्ज भरण्याची संधी असणार आहे. नियमित प्रवेशाच्या चार फेऱ्या संपल्यानंतर समुपदेशन फेरी होणार आहे.
२) या फेरीसाठी विद्यार्थ्यांना १७ जुलैपासून नोंदणी होणार आहे. अंतिम यादीपर्यंत अर्ज आलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश नियमित फेरीत होणार आहे.
जागा कमी, विद्यार्थी जास्त-
१) एक लाख ९६ हजार ४८ विद्यार्थ्यांची ही यादी असून यामध्ये ३० हजार ३३३ मुली, १ लाख ७० हजार ६३२ मुले आहेत. या विद्यार्थ्यांचे प्रवेश शासकीय तसेच खासगी आयटीआयमधील मागणी असलेल्या ट्रेडला १ लाख ५० हजार ३३२ जागांवर होणार आहेत.
२) यामुळे जागा कमी आणि विद्यार्थी जास्त असल्याने प्रवेश मिळवण्यासाठी मोठी चुरस होणार आहे. १३ जुलै रोजी पहिला प्रवेश कुठे मिळाला ही गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यानंतर पहिल्या गुणवत्ता यादीनुसार १४ जुलैपासून तीन दिवस या यादीत मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत.