Join us  

विद्यापीठाच्या प्रथमोपचार पेटीत मुदतबाह्य औषधे; विद्यार्थीनींची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 10:18 AM

मुंबई विद्यापीठात सुमारे ६० इमारती आहेत. नियमानुसार विद्यापीठाच्या प्रत्येक इमारतीत प्रथमोपचार पेटी ठेवणे आवश्यक आहे.

मुंबई : लहान-मोठ्या दुखापतींवर उपचारासाठी मुंबईविद्यापीठाच्या कलिना संकुलातील विविध इमारतींमध्ये विद्यार्थी-शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रथमोपचार पेटीत (फर्स्ट एड बॉक्स) मुदतबाह्य औषधे आढळून आली आहेत. या प्रथमोपचार पेटीतील औषधांची वेळोवेळी तपासणी होणे आवश्यक आहे. मात्र, ती होत नसल्याने मुदत उलटून गेलेली अनेक औषधे या पेटीत तशीच राहत आहेत.

मुंबई विद्यापीठात सुमारे ६० इमारती आहेत. नियमानुसार विद्यापीठाच्या प्रत्येक इमारतीत प्रथमोपचार पेटी ठेवणे आवश्यक आहे. परंतु, विद्यापीठाच्या ग्रंथालयासह अनेक इमारतींमध्ये या पेटीचा अभाव आहे. लेक्चर हॉल असलेल्या रानडे भवनमध्ये अशी पेटी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

१) या पेटीतील अनेक औषधांची मुदत ऑगस्ट २०२३, सप्टेंबर २०२३ मध्ये संपली आहे.

२) नियमानुसार या पेटीतील औषधांची वेळोवेळी तपासणी होणे आवश्यक आहे. मात्र, ती होत नसल्याने मुदत उलटून गेलेली औषधे बदलली जात नाहीत. त्यामुळे अचानक दुखापत झाल्यास वेळीच औषधे मिळत नाहीत, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

टॅग्स :मुंबईविद्यापीठ