मुंबईत का होते कमी मतदान? गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ ४८.७० टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 11:00 AM2024-04-04T11:00:43+5:302024-04-04T11:02:12+5:30

लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात मतदार राजा मतदान केंद्रावर कशा पद्धतीने येईल यासाठी काही दिवसांपासून विशेष प्रयत्न सुरू केले आहे.

in mumbai less than 50 percent voting is taking place in the 2019 lok sabha says elections election commission know the reason | मुंबईत का होते कमी मतदान? गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ ४८.७० टक्के मतदान

मुंबईत का होते कमी मतदान? गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ ४८.७० टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान होत असल्याचे निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय पातळीवर मतदान सरासरी ६७.७७ टक्के झाले होते, तर राज्य स्तरावर सरासरी मतदान ६१ टक्के इतके झाले आहे. लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात मतदार राजा मतदान केंद्रावर कशा पद्धतीने येईल यासाठी काही दिवसांपासून विशेष प्रयत्न सुरू केले आहे. त्यासोबतच शहरातील मतदार निवडणुकीत मतदान करण्याकरिता का येत नाही? या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचे कामसुद्धा सुरू करण्यात आले आहे.  

यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, म्हणून मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी दंड थोपटले आहे. मुंबई शहरात एकूण २४ लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत.  या ठिकाणी चांगल्या पैकी मतदार हा मोठ्या प्रमाणात उच्चभ्रू वस्तीतील आहे. त्याचप्रमाणे शहरात मध्यमवर्गीय  आणि गरीब स्तरातील मतदारही मोठ्या प्रमाणात आहेत.
 या शहरात १० विधानसभांचा समावेश आहे. त्यापैकी सहा विधासभांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान होते. 

१)  मतदान करण्याविषयी अनास्था. 

२)  सुट्टीचा आनंद घेणे. 

३)  मतदान केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहण्याची इच्छा नसते. 

मतदान न करण्याची कारणे कोणती?

१) गेल्या दोन महिन्यांत १७ हजार नवीन मतदारांची नोंदणी केली व अजूनही ते काम सुरू आहे. 

२) वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मतदान करण्यास त्रास होऊ नये, म्हणून पहिला मजला आणि तळघरातील मतदान केंद्रे रद्द केली आहेत. 

३) गृहनिर्माण संस्थांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्या पद्धतीने मतदान केंद्रे सुरू करत आहोत.
 
४) मतदान केंद्र दोन किलोमीटरच्या परिसरात ठेवले आहे. 

५) मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून पेंडॉल मतदान केंद्रे रद्द करून पक्क्या ठिकाणी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. 

 ५०% अधिक मतदान-

सर्वात कमी मतदान होणाऱ्या विधानसभांच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर कुलाबा मतदारसंघ आहे, तर त्या खालोखाल मुंबादेवी, धारावी,  भायखळा, वरळी आणि शिवडी हे मतदारसंघ आहेत, तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान करणाऱ्या मतदारसंघांत प्रथम क्रमांकावर वडाळा, त्याखालोखाल  माहीम, मलबार हिल आणि सायन कोळीवाडा या मतदारसंघांचा समावेश आहे. 

२०१९ मध्ये कुठे किती मतदान? (विधानसभा मतदारसंघनिहाय)

मुंबई शहरातील मतदान कसे वाढवता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे, म्हणून काय उपाययोजना करता येतील, त्या आम्ही करत आहोत. यासाठी आमचा २० हजारांपेक्षा अधिक कर्मचारी वर्ग मेहनत घेत आहे. त्याशिवाय आम्ही मतदान का कमी प्रमाणात होत आहे, याची कारणे शोधून त्यावर कशा पद्धतीने उत्तरे शोधता येतील, यासाठी काम करत आहोत.

निवडणूक जाहीर झाल्या, म्हणजे आता नवीन मतदारांना मतदान यादीत नाव नोंदविता येत नाही असे वाटत असते. मात्र, एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत नागरिकांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे.- संजय यादव, जिल्हाधिकारी, मुंबई

Read in English

Web Title: in mumbai less than 50 percent voting is taking place in the 2019 lok sabha says elections election commission know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.