Join us  

‘अमृत भारत योजने' अंतर्गत रेल्वे स्थानकांचे रुप पालटणार; दादर, कांदिवली, दहिसर, पनवेलचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 10:11 AM

‘अमृत भारत योजने’च्या अंतर्गत उत्तम प्रवासी सुविधा देण्यासाठी अमृत स्टेशन म्हणून निवडली जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘अमृत भारत योजने’च्या अंतर्गत उत्तम प्रवासी सुविधा देण्यासाठी अमृत स्टेशन म्हणून निवडली जात आहेत. या सर्व स्थानकांवर पुनर्विकासाचे काम सुरू आहे. या सुधारणांमध्ये स्थानक सुलभता, प्रतीक्षा क्षेत्र, शौचालय सुविधा, आवश्यकतेनुसार लिफ्ट आणि एस्केलेटरची स्थापना, स्वच्छता, मोफत वाय-फाय ऑफर करणे, ‘वन स्टेशन वन प्रॉड्क्ट’ उपक्रमाद्वारे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे हा हेतू आहे. 

एक्झिक्युटिव्ह लाउंजची स्थापना, व्यवसाय बैठकीसाठी जागा नियुक्त करणे, लँडस्केपिंग जोडणे आणि प्रत्येक स्टेशनच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. या योजनेत स्थानकांची संरचना सुधारणे, दोन्ही बाजूंच्या आसपासच्या शहरी भागांसह स्थानके एकत्रित करणे, मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटीला चालना देणे, दिव्यांग व्यक्तींसाठी सुविधा प्रदान करणे, शाश्वत पर्यावरणपूरक उपायांच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला आहे. 

या स्थानकांचा सहभाग-

या योजनेतील रेल्वे स्थानकांच्या यादीत दादर, पनवेल, कांदिवली, दहिसर या चार रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. अंधेरी, वांद्रे टर्मिनल, बोरीवली, भायखळा, चर्नीरोड, सीएसएमटी, चिंचपोकळी, ग्रँटरोड, जोगेश्वरी, कांजुरमार्ग, कुर्ला, एलटीटी, लोअर परळ, मालाड, मरिन लाइन्स, माटुंगा, मुंबई सेंट्रल, परेल, प्रभादेवी, सँडहर्स्ट रोड, वडाळा रोड, विद्याविहार, विक्रोळी येथे अमृत भारत स्टेशन योजना राबविली जात आहे.

टॅग्स :मुंबईराज्य सरकार