Join us  

मेट्रो वनच्या स्मार्ट 'बँड'चा वाजला बाजा; प्रवाशांकडून मिळतोय अल्प प्रतिसाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 9:50 AM

तिकिटासाठी मेट्रो कार्ड बाळगण्यापासून प्रवाशांची सुटका व्हावी म्हणून मुंबई मेट्रो वनने आणलेल्या स्मार्ट बँडचा बैंडबाजा वाजला आहे.

मुंबई : वर्सोवा घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेवर तिकीट काढण्यापासून आणि तिकिटासाठी मेट्रो कार्ड बाळगण्यापासून प्रवाशांची सुटका व्हावी म्हणून मुंबई मेट्रो वनने आणलेल्या स्मार्ट बँडचा बैंडबाजा वाजला आहे. या स्मार्ट बँडला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला. गेल्या दोन महिन्यांत केवळ ६९३ प्रवाशांनी हा बँड खरेदी केला आहे.

मेट्रो वन मार्गिकेवर कार्यालयीन वेळेत प्रवाशांची मोठी गर्दी होते. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी एमएमओपीएलने टॅप विअरेबल तिकीट एप्रिलमध्ये बाजारात आणले होते. त्यामुळे प्रवाशांना मेट्रोचे तिकीट बाळगण्याची किंवा मोबाइलद्वारे क्युआर कोड स्कॅन करण्याची गरज

एका टॅपवर प्रवेश-

बिलबॉक्स प्युअररिस्ट टेक सोल्युशन्सने ही तिकीट प्रणाली तयार केली आहे. त्यामुळे वॉलेटमध्ये मेट्रो कार्ड किंवा बॅगेत तिकीट बाळगावे लागणार नाही. शिवाय, मेट्रो स्थानकावर मोबाइल काढून क्युआर कोड स्कॅन करण्याचीही गरज नाही. मुंबई मेट्रो वनच्या एएफसी गेटवर फक्त मनगटावर लावलेल्या बँडवर टॅप करून स्थानकावर प्रवेश करता येतो. त्यामुळे वेळ वाचतो. हातातून खाली पडत नाही. हा बँड पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केला आहे. तसेच तो बॅटरीशिवाय चालत असून, जलरोधक आणि सहज वापरता येण्याजोगा आहे. मेट्रो १ मार्गिकेवर दररोज ४ लाख ६० हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र, ६९३ प्रवाशांनीच बँड खरेदी केला आहे.

टॅग्स :मुंबईमेट्रोएमएमआरडीए