Join us

म्हाडाच्या ‘या’ इमारती अतिधोकादायक स्थितीत; सर्वेक्षणातून माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 10:18 AM

या २० इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या ४ इमारतींचा समावेश आहे.

मुंबई : म्हाडाच्यामुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे  मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण केले असून, यावर्षी २० इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या २० इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या ४ इमारतींचा समावेश आहे.

अतिधोकदायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये ४९४ निवासी व २१७  अनिवासी असे एकूण ७११ रहिवासी / भाडेकरू आहेत.  ३६  निवासी भाडेकरू / रहिवाशांनी स्वतःची निर्वाहाची   पर्यायी व्यवस्था केली आहे, तर आतापर्यंत ४६ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित इमारतींमधील भाडेकरू/रहिवासी यांना घरे रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ४१२ निवासी भाडेकरू /रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असल्याने नियोजन केले आहे. संक्रमण शिबिरांत त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याबाबाबतची कार्यवाही प्रगतिपथावर आहे.

म्हाडाचा नियंत्रण कक्ष-

१) रजनी महल, पहिला मजला, ८९-९५, ताडदेव रोड, ताडदेव,

२)  दूरध्वनी क्रमांक - २३५३६९४५, २३५१७४२३. 

३) भ्रमणध्वनी क्रमांक - ९३२१६३७६९९ 

२० इमारतींमध्ये ७११ रहिवाशांचे वास्तव्य-

१) इमारत क्रमांक ४-४ ए, नवरोजी हिल रोड क्रमांक १, जॉली चेंबर ( मागील वर्षीच्या यादीतील)

२) इमारत क्रमांक ५७ निझाम स्ट्रीट  

३) इमारत क्रमांक ६७, मस्जिद स्ट्रीट

४) इमारत क्रमांक ५२–५८, बाबू गेनू रोड

५) इमारत क्रमांक ७ खंडेराव वाडी/ २०४–२०८, काळबादेवी रोड

६) इमारत क्रमांक ५२-५२ अ, २ री डेक्कन क्रॉस रोड

७) इमारत क्रमांक १२५–१२७ ए, जमना निवास, खाडीलकर रोड, गिरगाव

८) इमारत क्रमांक ३१४ बी, ब्रम्हांड को-ऑप हौ. सोसायटी, व्ही. पी. रोड, गिरगाव

९) इमारत क्रमांक ४१८–४२६  एस. व्ही. पी. रोड,(१२४ ते १३४ए ) गोलेचा हाऊस

१०) इमारत क्रमांक ८३ – ८७ रावते इमारत, जे.एस.एस.रोड, गिरगाव

११) इमारत क्रमांक  २१३–२१५ डॉ. डी. बी. मार्ग 

१२) इमारत क्रमांक ३८–४०  स्लेटर रोड

१३) ९ डी चुनाम लेन 

१४) ४४ इ नौशीर भरूचा मार्ग

१५) १ खेतवाडी १२ वी लेन 

१६) ३१ सी व ३३ ए, आर. रांगणेकर मार्ग व १९ पुरंदरे मार्ग, गिरगाव चौपाटी  (मागील वर्षीच्या यादीतील)

१७) इमारत क्रमांक  १०४-१०६, मेघजी बिल्डिंग, अ, ब व क विंग, शिवदास चापसी मार्ग (मागील वर्षीच्या यादीतील)  

१८) इमारत क्रमांक  ५५-५९–६१–६३–६५ सोफिया झुबेर मार्ग

१९) इमारत क्रमांक ४४-४८, ३३-३७  व ९-१२ कामाठीपुरा ११ वी व १२ वी गल्ली, देवल बिल्डिंग 

२०) अंतिम भूखंड क्रमांक  ७२१ व ७२४ टीपीएस - ३ विभाग, इमारत क्रमांक ४० बी व ४२८, उपकर क्र. ग उत्तर ५०-९५ (१) आणि ग उत्तर -५१०३ आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ (मागील वर्षीच्या यादीतील)

टॅग्स :मुंबईम्हाडा