‘मूनलायटिंग’ करणारे आयकरच्या रडारवर; दुसरे उत्पन्न विवरणपत्रात देणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 09:54 AM2024-06-11T09:54:12+5:302024-06-11T09:57:29+5:30

गेल्या आर्थिक वर्षात मुंबईत किमान ११०० लोकांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती.

in mumbai moonlighting are required to show their other income should taxable and pay ancillary tax on it income tax department has given direction for action against them | ‘मूनलायटिंग’ करणारे आयकरच्या रडारवर; दुसरे उत्पन्न विवरणपत्रात देणे गरजेचे

‘मूनलायटिंग’ करणारे आयकरच्या रडारवर; दुसरे उत्पन्न विवरणपत्रात देणे गरजेचे

मुंबई : नोकरीकरता करता अन्य काम करून पैसे कमावणाऱ्या अर्थात मूनलायटिंग करणाऱ्या लोकांनी त्यांचे दुसरे उत्पन्न आयकर विवरणात दाखवून त्यावर अनुषंगिक कर भरणे गरजेचे आहे. असे न केल्यास त्यांच्यावर कारवाईचे संकेत आयकर विभागाने दिले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात मुंबईत किमान ११०० लोकांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती.

गेल्यावर्षी मूनलायटिंग करणाऱ्या काहींनी आयकर विवरण भरताना आपल्या अतिरिक्त उत्पन्नाची नोंद ‘बिझनेस इन्कम’ या श्रेणीत न करता ‘इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस’ या श्रेणीमध्ये केली होती. अशी नोंद केल्यामुळे अनेकांना या पैशांवर विविध प्रकारच्या खर्चाचा दावा करता येतो. परिणामी, कराची रक्कम कमी होते. मात्र, दुसरे काम करून उत्पन्न मिळवत असलेल्यांनी त्याची नोंद ‘बिझनेस इन्कम’ श्रेणीतच करून त्यावर कर भरणे आवश्यक आहे.

गेल्या वर्षी ११०० जणांवर कारवाई-

गेल्यावर्षी मुंबईत ११०० लोकांना या प्रकरणी नोटिसा जारी करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या लोकांचे अतिरिक्त उत्पन्न त्यांच्या नोकरीपोटी मिळणाऱ्या पगारापेक्षा अधिक असल्याचे आयकर विभागाच्या अंतर्गत तपासणीत आढळले. ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५ ते १० लाख रुपयांदरम्यान आहे, अशांना या नोटिसा जारी करण्यात आल्या होत्या.

१५० जण आपत्ती प्रतिसाद पथकात  -

सुरक्षा रक्षकांच्या पदाच्या बाबतीतही असेच आहे. त्यांची एकूण ३८०९ पदे असून, त्यांपैकी १९८४ पदे रिक्त आहेत. सुमारे १५० सुरक्षा  रक्षकांना शहर आपत्ती प्रतिसाद पथकात कर्तव्य बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रिक्त  पदांमुळे त्यांच्यावरही कामाचा ताण आहे. सुरक्षा चौक्या आणि पहाऱ्याची ठिकाणे सुरक्षेविना ठेवता येत नसल्याने या सुरक्षा  रक्षकांना  सलग दोन ते तीन पाळ्यांमध्ये राबवून घेतले जात आहे, असे म्युनिसिपल युनियनचे म्हणणे आहे.

Web Title: in mumbai moonlighting are required to show their other income should taxable and pay ancillary tax on it income tax department has given direction for action against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.