Join us  

पेंग्विन धावतो दुडुदुडु, अस्वल दाखविते वाकुल्या! राणी बागेत १५ दिवसांत ५० हजारांपेक्षा जास्त पर्यटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 10:12 AM

वीर जिजामाता उद्यान आणि प्राणी संग्रहालयात पर्यटकांची गर्दी नवी नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एकीकडे पेंग्विनचे दुडुदुडु धावणे सुरू असते आणि मध्येच तो पाण्यात सूर मारून जलविहाराचा आनंद लुटतो, तर दुसऱ्या पिंजऱ्यात अस्वल वाकुल्या दाखवत असते. विस्तीर्ण अशा पिंजऱ्यात वनराज दमदार पावले टाकत फेरफटका मारत असतात.  भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील हे चित्र. वन्यप्राणी, पशु, पक्षी पहायला या ठिकाणी रोज गर्दी जमत असते. ऑगस्टच्या पंधरवड्यात ५० हजारांपेक्षा जास्त पर्यटकांनी उद्यानाला भेट दिली आहे. 

वीर जिजामाता उद्यान आणि प्राणी संग्रहालयात पर्यटकांची गर्दी नवी नाही. अलीकडच्या काळात या ठिकाणी भेट देणाऱ्यांची संख्या वाढतच आहे.  ऑगस्ट महिन्याच्या पंधरवड्यात ५० हजारांपेक्षा जास्त पर्यटकांनी उद्यानाला भेट दिली आहे.  

पेंग्विन, अस्वल, सिंह लोकप्रिय संग्रहालयाला भेट देणारे पशु, पक्षांच्या पिंजऱ्याला भेट देतात. जास्त गर्दी सिंहाच्या पिंजऱ्याभोवती दिसते. त्यातही दुडुदुडु धावणारे पेंग्विन पाहण्यास गर्दी दिसते.

महिना-

१) जानेवारी        पर्यटक - २,९१,१३६ महसूल (रु.)- १,१४,६६,९८७

२) फेब्रुवारी        पर्यटक - १,९०,५७० महसूल (रु.)- ७७,५३,६१०

३) मार्च        पर्यटक - १५,००९१ महसूल (रु.)- ६०,८९,०४५

४)एप्रिल        पर्यटक - २,१७,८९४ महसूल (रु.)- ८६,४५,७८०

५) मे         पर्यटक - ३,१७,२८७ महसूल (रु.)- २२,७४,९६५

६) जून          पर्यटक - २,०४,७४५महसूल (रु.)- ८०,९३,६४१

७) जुलै          पर्यटक - ५७,८५३ महसूल (रु.)- २४,७६,५००

८) ऑगस्ट     पर्यटक - ५५,४६६ महसूल (रु.)-  २३,४०,८१०

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाराणी बगीचा