Join us

झोपमोड केल्याच्या रागात आईची हत्या, मुलास अटक : सुरा हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 10:19 AM

झोपमोड केल्याच्या रागात मुलाने सुऱ्याने वार करून ७८ वर्षीय आईची हत्या केली.

मुंबई : झोपमोड केल्याच्या रागात मुलाने सुऱ्याने वार करून ७८ वर्षीय आईची हत्या केली. ही घटना चुनाव लेनच्या पंडितालय इमारतीत घडली. रमाबाई नथू पिसाळ असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी आरोपी मुलगा सुभाष पुंजाजी वाघ (६४) याला केली आहे.

अटक सुभाष हा पहिल्या पतीचा मुलगा असून, तो रमाबाईसोबत राहत होता. सुभाष सकाळी पाणी भरण्यासाठी रोज लवकर उठायचा. त्यासाठी रात्री लवकर झोपत असे. मात्र, रात्रीच्या वेळी रमाबाई घरातील कामे करत असल्यामुळे त्याची झोपमोड व्हायची. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत असे. मंगळवारी सकाळी सात ते पावणे आठच्या दरम्यान त्याची झोपमोड झाल्याने त्यांच्यात वाद झाला. राग अनावर झाल्याने त्याने सुऱ्याने सपासप वार करून आईची हत्या केली. या घटनेच्या काही वेळानंतर त्याने शेजारी राहणाऱ्या २७ वर्षीय पुतण्याला आईची हत्या केल्याचे सांगितले. पुतण्याने त्वरित पोलिसांना फोन केला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत जे. जे. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी रमाबाईला मृत घोषित केले.

या प्रकरणी डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, गुन्ह्यात वापरलेला सुरा हस्तगत केला आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस