Join us  

नवरात्रोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज; अर्ज केल्यानंतर ४८ तासांत वीजजोडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 9:34 AM

मुंबईसह राज्यभरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना सवलतीत म्हणजे घरगुती दराने वीजपुरवठा करण करण्याचा निर्णय महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या वीज कंपन्यांनी घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईसह राज्यभरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना सवलतीत म्हणजे घरगुती दराने वीजपुरवठा करण करण्याचा निर्णय महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या वीज कंपन्यांनी घेतला आहे. उत्सवातील सुरक्षेची सर्व खबरदारी मंडळांनी घ्यावी, असे आवाहन वीज कंपन्यांनी केले आहे.

अदानी इलेक्ट्रिसिटीने मंडपांसाठी तात्पुरती वीजजोडणी घेण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. अर्ज केल्यानंतर ४८ तासांतच आयोजकांना वीजजोडणी मिळू शकेल. त्यासाठी त्यांनी वेबसाइटवर जाऊन न्यू कनेक्शन विभागात तात्पुरती वीजजोडणीच्या लिंकवर जावे. यावेळी पुरवठा जोडणीसाठी अदानी कंपनीची पथके सज्ज आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शीघ्र प्रतिसाद पथके मोक्याच्या ठिकाणी तैनात केली जाणार आहेत.

... मंडपांमध्ये अशी घ्यावी खबरदारी

१) वायरिंग सुसज्ज असावी. मीटर केबिनमध्ये फक्त अधिकृत व्यक्तींना प्रवेश द्यावा. 

२) वीजजोडण्यांसाठी मान्यताप्राप्त वायर आणि स्विच वापरावेत. 

३) आपत्कालीन स्थितीमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यासाठी एक पॉइंट असावा. 

३)  वायरिंगना लावण्यासाठीच्या टेप मान्यताप्राप्त असाव्यात.

४) मीटर केबिन आणि कनेक्शनच्या परिसरात जाण्यासाठी वाट ठेवावी. 

 ५) मंजूर केलेल्या वीज क्षमतेएवढाच वीजभार मंडपात वापरण्यात यावा. 

६) न्यूट्रलचे व्यवस्थित अर्थिग व्हावे. मीटर केबिनला अर्थिग आवश्यक. 

७)  एक्स्टेन्शनसाठी थ्री पिन प्लग वापरावा. 

८) अग्निशामन उपकरण मीटर केबिनजवळ ठेवावे.

टॅग्स :मुंबईनवरात्रीवीज