Join us

फॅशन स्ट्रीट'ला नवा लूक ! स्टॉल्ससाठी पालिकेकडून प्रोटोटाइप तयार; लवकरच अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 9:29 AM

कपडे खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या 'फॅशन स्ट्रीट'वर स्वस्त कपडे मिळत असल्याने तरुणाईची नेहमीच गर्दी असते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कपडे खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या 'फॅशन स्ट्रीट'वर स्वस्त कपडे मिळत असल्याने तरुणाईची नेहमीच गर्दी असते. मात्र, जागेचा अभाव आणि अन्य गैरसोयी लक्षात घेता फॅशन स्ट्रीटला नवीन रूप देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. येथील दुकानांची रचना बदलण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून या पार्श्वभूमीवर स्टॉल्सच्या नवीन डिझाइन्स आणि आकाराचे सहा स्टॉल्सचा नमुना (प्रोटोटाइप) प्रशासनाकडून तयार करून घेण्यात आले आहेत.

फॅशन स्ट्रीटवरील अधिकृत गाळेधारकांना हे प्रोटोटाइप विकण्यात येणार असून, त्यांना यामध्ये बदलही सुचविण्यात येणार आहेत. या एकाच प्रकारच्या प्रोटोटाइपमुळे फॅशन स्ट्रीटवर बरीच मोकळी जागा व फुटपाथ उपलब्ध होऊन त्याचे नियोजन पालिकेला करता येणार आहे.

सुरक्षेची काळजी घेणार-

१) फॅशन स्ट्रीटवर सध्या असलेले स्टॉल्स, कपड्यांचे गाळे हे फुटपाथची जागा मोठ्या प्रमाणावर व्यापत आहेत. त्यामुळे त्यांच्या रचनेत बदल करून नवीन प्रोटोटाइप पालिकेकडून तयार करून घेण्यात आला आहेत. दोन ते तीन दुकानांमध्ये काहीसे अंतर ठेवले जाईल. तसेच सध्या फुटपाथवरील दुकाने समोरील बाजूने काही प्रमाणात वाढवण्यात आली असून ती मागे कशी शी घेता घेता येईल, याकडे विशेष लक्ष दिले जाईल. यातून ग्राहकांना मोकळी जागा उपलब्ध करण्याचा प्रयत्न असणार आहे. 

२) आगीसारखी दुर्घटना घडू नये याचीही काळजी यामध्ये प्रामुख्याने घेतली जाणार आहे. सध्या या प्रोटोटाइपची किंमत जास्त असली तरी तेथील स्टॉल्सधारकांकडून मागणी वाढल्यानंतर अधिक उत्पादनांमुळे किंमत आपोआप कमी होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सल्लागाराची नियुक्ती-

१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट स्थानकांपासून १० मिनिटांच्या अंतरावर आकर्षक तयार कपड्यांसाठी फॅशन स्ट्रीट प्रसिद्ध आहे.

२) एका फुटपाथवर ११२ दुकाने आहेत. अलीकडे राज्यातून तसेच देशभरातून आणि विदेशी पर्यटकही फॅशन स्ट्रीटला येऊन खरेदी करतात. मागील काही वर्षांपासून दुकानांनी अर्धा फुटपाथ व्यापलेला आहे.

३) खरेदीदारांची संख्या वाढत चालल्याने फुटपाथवरून चालण्यासाठी पादचाऱ्यांना जागा उपलब्ध नाही. तसेच खरेदीस आलेल्यांसाठी पुरेशा सुविधा नसल्याने ग्राहकांची गैरसोय होते. त्यामुळे फॅशन स्ट्रीटला नवीन रूप देऊन पुरेशा सुविधा देण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यासाठी एका सल्लागाराची नियुक्तीही केल

टॅग्स :मुंबईनगर पालिकाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस