मुंबईत आता प्रत्येक विभागामधील तीन मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम

By जयंत होवाळ | Published: January 18, 2024 08:13 PM2024-01-18T20:13:01+5:302024-01-18T20:13:30+5:30

सखोल स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील मंदिरांची स्‍वच्‍छता आणि रोषणाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

In Mumbai now cleanliness drive in three temples in each division | मुंबईत आता प्रत्येक विभागामधील तीन मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम

मुंबईत आता प्रत्येक विभागामधील तीन मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम

मुंबई :  स्वच्छता मोहिम अभियानात आता मुंबईतील मंदीरांचाही समावेश  करण्यात आला आहे.  प्रत्येक विभागातील तीन मंदिरांची स्वच्छता तर केली जाईलच, शिवाय या मंदिरांना रोषणाईही केली जाणार आहे. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या निर्देशानुसार, महानगरपालिकेच्‍या प्रत्‍येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात  दर आठवड्यात एक दिवस संपूर्ण स्वच्छ‍ता मोहीम राबविण्यात येत आहे. ही संपूर्ण स्वच्छता मोहीम राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात ‘महास्वच्छता अभियान’ स्वरुपात राबविण्‍याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

सखोल स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील मंदिरांची स्‍वच्‍छता आणि रोषणाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्‍यानुसार, महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील मंदीर परिसर स्‍वच्‍छतेसाठी  सखोल स्‍वच्छता मोहीम राबविण्‍याच्या सूचना दिल्या आहेत.

२२ जानेवारी २०२४ पर्यंत दररोज महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मंदिरांच्‍या परिसरात सखोल स्वच्छता मोहीम राबविली जाणारी आहे. प्रत्‍येक प्रशासकीय विभागातील किमान तीन प्रमुख मंदिरांची स्‍थानिक पातळीवर निवड केली जाईल. परिमंडळ सहआयुक्‍त, उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त यांना याबाबतचे निर्देश देण्‍यात आले आहेत. मंदीर स्‍वच्‍छता मोहिमेत मुंबईकर नागरिकांनी सहभागी व्‍हावे आणि श्रमदान करावे, असे आवाहन अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. सुधाकर शिंदे यांनी  केले आहे. 

Web Title: In Mumbai now cleanliness drive in three temples in each division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.