Join us

आता राज्यात फिरता दवाखाना, ३५ मोबाईल मेडिकल व्हॅनद्वारे आरोग्य तपासणी

By संतोष आंधळे | Published: March 01, 2024 4:39 PM

१ कोटींचा खर्च अपेक्षित असून ३५  मोबाईल मेडिकल क्लीनिलकल व्हॅनसाठी ३५ कोटी खर्च येणार आहे.

संतोष आंधळे, मुंबई : राज्यनातंर्गत विशेष करून ग्रामीण , दुर्गम  भागात सेवा न पोहचू शकणाऱ्या भागातील सर्व सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर प्रत्येकी एक फिरता  दवाखाना वाहन ( मोबाईल मेडिकल क्लीनिलकल व्हॅन ) उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाने तयार करून करून शासनाला पाठविला आहे. फिरता  दवाखाना वाहन खरेदी करण्यासाठी १ कोटींचा खर्च अपेक्षित असून ३५  मोबाईल मेडिकल क्लीनिलकल व्हॅनसाठी ३५ कोटी खर्च येणार आहे.

अनेकवेळा तालुका स्तरावर ग्रामीण भागात रुग्णालये असून सुद्धा रुग्णांना आरोग्याच्या सेवा प्राप्त होत नाही. कारण काही वयोवृद्ध नागरिक अशा दुर्गम भागात राहतात त्या ठिकाणाहून त्यांना रुग्णालयात जाणे शक्य नसते. राज्यातील आजही अशी अनेक ठिकाणे आहेत त्या ठिकाणाहून रुग्णांना दवाखान्यात येताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

अनेकवेळा बातम्यांमध्ये पहिले असेल रुग्णांना दवाखान्याच्या ठिकाणी नेण्यासाठी डोलीचा वापर केला जातो. मात्र सार्वजनिक आरोग्य विभागाने आता दुर्गम भागात सेवा देण्यासाठी मोबाईल मेडिकल क्लीनिलकल व्हॅन नेण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीमध्ये डॉक्टर, परिचारिका तसेच औषधे यामध्ये असणार आहे. रुग्णांना आहे त्या ठिकणी तपासून उपचार देण्यात येणार आहे. जर त्या रुग्णाला त्या ठिकाणी सेवा देण्यात अडचणी येत असतील तर त्याला त्याच गाडीने किंवा ऍम्बुलन्सने मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.    

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  राज्यात अनेक वेळा रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा आजार बळावतो. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्य मध्ये अनेक गुंतागुंत निर्माण काहीवेळा परिस्थिती गंभीर होते. त्यामुळे अशा रुग्णांना वेळेत उपचार देणे गरजेचे आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने फिरत दवाखाना वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :मुंबईहॉस्पिटल