Join us

धक्कादायक! आईस्क्रिमच्या कोनमध्ये सापडलं तुटलेलं बोट; मुंबईतील घटनेनं खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 12:44 PM

मुंबईतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Mumbai :मुंबईतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मालाडमध्ये एका महिलेने ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रिमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रिम कोनचा फोटो शेअर करत या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे आता ऑनलाईन पद्धतीने एखादी वस्तू ऑर्डर करावी की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

मालाड पोलिसांनी घटनेची तात्काळ दखल घेत आईस्क्रिम कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आईस्क्रिममध्ये सापडलेलं मानवी बोट फॉरेन्सिककडे तपासणीसाठी पाठवल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. ब्रेंडन सेराओ (२७) असं तक्रार करण्याऱ्या महिलेचं नाव आहे. सेराओ या स्वत: एक डॉक्टर आहेत. घडलेल्या प्रकारानंतर ब्रेंडन यांनी क्षणाचाही विलंब न करत पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. 'यम्मो' नावाच्या कंपनीचं हे आइस्क्रिम प्रोडक्ट असल्याचं सांगण्यात येत आहे. 

रिपोर्टनूसार बुधवारी या महिलेने ऑनलाईन अॅपवरून आईस्क्रिम कोन ऑर्डर केला होता. यम्मो बटरस्कोच फ्लेवरचं आईस्क्रिम तिने ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. पण अर्ध्याहून जास्त आईस्क्रिम कोन खाल्ल्यानंतर काहीतरी टणक पदार्थ लागला. त्यामुळे सेरिओ यांना संशय आला आणि हे प्रकरण उघडकीस आलं. साधारण २ सेमी लांबीचे मानवी बोट या कोनमध्ये सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ज्या कंपनीने हे आईस्क्रिम बनवलं आणि त्याची विक्री केली त्याचा शोध घेण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस