Join us  

ऑनलाइन गुंतवणूक करताय सावधान ! मुंबईत ५ महिन्यांत ३५५ गुन्हे, दोघे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 10:13 AM

गेल्या पाच महिन्यांत ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली केलेल्या फसवणुकीचे सर्वाधिक ३५५ गुन्हे नोंद झाले आहेत.

मुंबई : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखवत एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला पाच कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोघांना अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या पाच महिन्यांत ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली केलेल्या फसवणुकीचे सर्वाधिक ३५५ गुन्हे नोंद झाले आहेत. त्यामुळे ऑनलाइन गुंतवणूक करताना सावध राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

इंश्युरन्स/ पीएफ ०५ करन्सी १८ सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या तक्रारीनुसार, जानेवारीमध्ये तो एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी झाला. त्या ग्रुपमध्ये ऑनलाइन शेअर ट्रेडिंगबाबत चर्चा होत असत. त्यावरील नफ्याच्या चर्चा लक्षात घेत त्यानेही गुंतवणुकीचा निर्णय घेतला. त्याकरिता आरोपींनी त्याला 'रिटेल होम' अॅप डाउनलोड करण्यास सांगून त्याचे व्हर्चुअल अकाउंटही तयार केले. त्याच्यासह कुटुंबातील आणखी तिघांनी यात सहभाग घेतला.टॅक्ससह विविध कारणे पुढे देण्यास सुरुवात केली.

१) संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने, पैसे ट्रान्सफर केलेल्या बँकखातेधारकांपैकी सुरक्षारक्षक हमप्रीतसिंग रंधवा (३४) आणि खासगी शिकवणी घेणारा विमलप्रकाश गुप्ता (४५) यांना अटक केली आहे. रंधवा याने १० हजारांत त्याचे बँक खाते सायबर भामट्यांना विकल्याचे तपासात निष्पन्न झाले.

१० हजारांत विकले बँक खाते-

१) तक्रारदार आणि त्याच्या कुटुंबीयांनी जानेवारी ते मार्चदरम्यान एकूण पाच कोटी १४ लाख रुपये जवळपास ५० बँक खात्यांत ट्रान्सफर केले.

२) या गुंतवणुकीवर त्यांना अॅपवर ८१ कोटींच्या घरात नफा दाखविला जात होता. ते पैसे काढण्याचा त्यांनी प्रयत्न करताच आरोपींनी टॅक्ससह विविध कारणे पुढे देण्यास सुरुवात केली.

३) संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने, पैसे ट्रान्सफर केलेल्या बँक खातेधारकांपैकी सुरक्षारक्षक हमप्रीतसिंग रंधवा (३४) आणि खासगी शिकवणी घेणारा विमलप्रकाश गुप्ता (४५) यांना अटक केली आहे. रंधवा याने १० हजारांत त्याचे बँक खाते सायबर भामट्यांना विकल्याचे तपासात निष्पन्न झाले.

४२२ गुन्ह्यांची उकल, ५१२ जणांना अटक-

१) सायबर गुन्हेगार अशाच प्रकारे गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांचे बँक खाते रिकामे करत आहेत. गेल्या पाच महिन्यांत सायबरशी संबंधित एकूण दोन हजार १९७ गुन्ह्यांची नोंद सायबर पोलिसांच्या दफ्तरी झाली आहे. यापैकी ४२२ गुन्ह्यांची उकल करत ५१२ जणांना अटक करण्यात आली आहे.

गुंतवणुकीच्या गुन्ह्यांत २१ जणांना बेड्या-

१) या गुन्ह्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यातील एक हजार ३२२ घटनांमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सर्वाधिक ३५५ गुन्हे आहेत. त्यापैकी ७६ गुन्ह्यांची उकल करत २१ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिसधोकेबाजी