मुंबईकरांना धुरक्यातून शाेधावा लागताेय मार्ग; हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढलेलेच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 10:15 AM2024-01-05T10:15:21+5:302024-01-05T10:17:15+5:30
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, याचा परिणाम म्हणून हवेतील बाष्प वाढू लागले आहे.
मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, याचा परिणाम म्हणून हवेतील बाष्प वाढू लागले आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढत असून, ओलावा असलेल्या वातावरणात धूलिकण मिसळत आहेत. याचा परिणाम म्हणून गेल्या दोन दिवसांपासून मुंबई पुन्हा एकदा प्रदूषणाने वेढल्याची माहिती वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडिया यांनी दिली. शिवाय मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांमुळे हवेत उठणारी धूळ आणि त्यात आता पडलेल्या भरीने मुंबईतली दृश्यमान्यताही कमी झाली आहे.
७ जानेवारीनंतर जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे वाहू लागतील. तेव्हा या वाऱ्यासोबत
स्थिर असलेली प्रदूषके वाहून जातील आणि प्रदूषण कमी होईल.
याच काळात तापमानही कमी होईल, याकडेही राजेश कपाडिया यांनी लक्ष
वेधले.
हवेत उठणारी धूळ आणि त्यात आता पडलेल्या भरीने मुंबईतली दृश्यमान्यताही कमी झाली आहे. हवेत उठणारी धुळीमुळे रेल्वे मार्गावर लाेकलचा वेगही काहीसा मंदावला आहे.
हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ः
ठिकाण निर्देशांक
बीकेसी १४७
बोरीवली (पू) १०२
चेंबूर २५४
कुलाबा १४४
घाटकोपर १११
कांदिवली (प) १५३
वांद्रे १२३
भांडुप ११०
कुर्ला १४३
मालाड १२४
मुलुंड ११६