Join us  

माजी क्रिकेटपटू झहीर खानच्या हस्ते पिकलबॉल अहवालाचे अनावरण

By मनोहर कुंभेजकर | Published: July 09, 2024 4:33 PM

कृशांग स्पोर्ट्सने “पिकलबॉल: द डेव्हलपमेंट रोडमॅप फॉर इंडिया” या शीर्षकाचा आपला ताजा अहवाल प्रसिद्ध केला.

मनोहर कुंभेजकर, मुंबई : कृशांग स्पोर्ट्सने “पिकलबॉल: द डेव्हलपमेंट रोडमॅप फॉर इंडिया” या शीर्षकाचा आपला ताजा अहवाल प्रसिद्ध केला. हा अहवाल आयआयएसएम (आंतरराष्ट्रीय क्रीडा आणि व्यवस्थापन संस्था) आणि एआयपीए (ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन) यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. हा अहवाल खेळाबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करतो आणि खेळाचा विकास करण्यासाठी फ्रेमवर्क विस्तृत करतो.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान, आयआयएसएमचे संस्थापक संचालक नीलेश कुलकर्णी आणि विलेपार्लेचे आमदार ॲड. पराग अळवणी यांच्या हस्ते या अहवालाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे विश्वस्त  राजू रावल, मकरंद येडुरकर तसेच प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे व आंतरराष्ट्रीय पिकलबॉल असोसिएशन अध्यक्ष अरविंद प्रभू आदी उपस्थित होते. हा  कार्यक्रम नुकताच प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात पार पडला.

झहीर खान म्हणाले की,पिकलबॉलवरील अहवाल सादर करण्याच्या विक्रमासह सुरुवात करताना मला खूप सन्मान वाटतो.

पिकलबॉल हे टेनिस, टेबल टेनिस आणि बॅडमिंटनचे संयोजन आहे. हा एक मनोरंजक खेळ आहे जो भारतात लोकप्रिय होत आहे.“हा क्रिशांग स्पोर्ट्सचा एक अनोखा उपक्रम आहे, ज्यात पिकलबॉल वेगाने वाढत असून त्यावर प्रकाश टाकणे आवश्यक होते आणि अहवालात अधोरेखित केलेल्या विकास आराखड्यामुळे राज्य आणि जिल्हा घटकांना त्याचा फायदा होईल ". कृष्णांग स्पोर्ट्सचे संस्थापक मेहूल रावल यांनी ही माहिती दिली.

विदर्भ पिकलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्रेयांश मेहता म्हणाले की, हा महत्त्वाचा अहवाल असून त्याचा आम्हाला फायदा होईल.

टॅग्स :मुंबईझहीर खान