...तर लाडक्या बहिणींची होऊ शकते फसवणूक; माहिती शेअर न करण्याचे पोलिसांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 11:25 AM2024-07-30T11:25:57+5:302024-07-30T11:30:11+5:30

‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली फसवणुकीसाठी सायबर भामटेही सक्रिय झाले आहेत.

in mumbai police request not to share information to ladki bahin yojana applicants | ...तर लाडक्या बहिणींची होऊ शकते फसवणूक; माहिती शेअर न करण्याचे पोलिसांचे आवाहन

...तर लाडक्या बहिणींची होऊ शकते फसवणूक; माहिती शेअर न करण्याचे पोलिसांचे आवाहन

मुंबई : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली फसवणुकीसाठी सायबर भामटेही सक्रिय झाले आहेत. त्यामुळे योजनेच्या नावाखाली मोबाइलवर आलेला ओटीपी किंवा अनोळखी लिंकवर गेल्यास बँक खाते रिकामे होऊ शकते. त्यामुळे कुणालाही आपली गोपनीय माहिती शेअर करू नका, तसेच कुठल्याही लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन वेळोवेळी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सायबर भामटे विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली गोपनीय माहिती घेत फसवणूक करण्याचे प्रकार वेळोवेळी समोर येत आहेत. अनोळखी लिंक पाठवूनही तुमच्या खात्यावर ऑनलाइन डल्ला मारत आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही मधाळ आमिषाला बळी न पडता, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. प्रत्यक्षात या सेवा पदरी पाडून घेण्यासाठी लिंक डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जाते. ही लिंक डाऊनलोड केल्यास मालवेअर किंवा व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती भामटे मिळवतात. त्याआधारे आर्थिक फसवणूक, माहितीची चोरी, बदनामी किंवा अन्य गुन्हे घडू शकतात. त्यामुळे अशा भामट्यांना जाळ्यात अडकत पडू नका, असे आवाहन सायबर विभागाने नागरिकांना केले आहे.  

सायबर तक्रारीसाठी येथे करा संपर्क-

तुम्हीही सायबर ठगांच्या जाळ्यात अडकलात तर तत्काळ १९३० या सायबर पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र पोलिसांकडून करण्यात येत आहे.

गोल्डन अवर्स...

१) खात्यातून पैसे गेल्याचे समजताच तासाभराच्या आत संपर्क साधल्यास पैसे वाचण्याची शक्यता जास्त असते. सायबर सेलच्या म्हणण्यानुसार, फसवणुकीमध्ये तीन टप्प्यात काम चालते. सध्या फसवणुकीची रक्कम खात्यात जमा होताच, त्याच वेळेत दुसरीकडे काढण्यास सुरुवात होते. तर, काही प्रकरणात विविध शॉपिंग संकेतस्थळावर खरेदीसाठी पैसे अडकवले जात असल्याचे कारवाईतून दिसून येत आहे. 

२) पैसे काढण्यासाठी असलेली लिमिट, ऑनलाइन ट्रान्सफर प्रक्रियेमुळे पैसे काढण्यास वेळ जातो. यापूर्वीच तक्रारदार पोलीस ठाण्यास आल्यास तत्काळ तांत्रिक पुराव्याच्या मदतीने  संबंधित बँकेशी संपर्क साधून पैसे वाचविण्यास मदत होते.

Web Title: in mumbai police request not to share information to ladki bahin yojana applicants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.