पूर बधितांना नुकसान भरपाई द्या; वॉचडॉग फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By मनोहर कुंभेजकर | Published: July 8, 2024 05:08 PM2024-07-08T17:08:10+5:302024-07-08T17:10:27+5:30
मुंबईतील १०० टक्के नालेसफाई आम्ही केली, असा पालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे.
मनोहर कुंभेजकर, मुंबई: मुंबईतील १०० टक्के नालेसफाई आम्ही केली असा पालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे.अंधेरी पूर्व मरोळ चर्च भाग ४ फूट खोल पाण्यात होता, ज्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले.अनेक निवासी आवारात आणि दुकानांमध्येही पाणी शिरले.
नाल्यांच्या कॉस्मेटिक साफसफाईमुळे मुंबईतील अनेक भागात पूरजन्य स्थिती निर्माण झाली.या घटनांमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त ॲड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे इमेल द्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी नाल्याच्या साफसफाईच्या प्रक्रियेवर थेट देखरेख ठेवले होते आणि मुंबई भाजप अध्यक्ष,आमदार अँड. आशिष शेलार यांनी मुंबईतील विविध नालेसफाईच्या ठिकाणी भेटी दिल्या होत्या.मात्र पालिका प्रशासनाने केलेल्या केलेल्या उपाययोजना अपुऱ्या होत्या. त्यामुळे पहिल्याच पावसात शहरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.मान्सूनची योग्य पूर्व तयारी आणि प्रतिसाद सुनिश्चित करण्यातील पालिका प्रशासनाच्या अपयशाने नागरी प्रशासनातील महत्त्वपूर्ण त्रुटी अधोरेखित केली आहे.परिणामी पालिका प्रशासनाच्या संपूर्ण फेरबदलाची मागणी ॲड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी मुख्यमंत्र्यांकडे व पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या कडे केली आहे.
नागरी प्रशासनाचे घसरणारे दर्जे चिंताजनक आहेत आणि कार्यक्षमता आणि जबाबदारी पुनर्संचयित करण्यासाठी सर्वसमावेशक सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
अतिरिक्त पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि भविष्यातील पूर टाळण्यासाठी ही नैसर्गिक संसाधने महत्त्वपूर्ण आहेत.त्यामुळे मुंबईचे सर्व तलाव आणि तलावांचे पुनरुज्जीवन करून नदीकाठावरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी करतो. अतिरिक्त पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि भविष्यातील पूर टाळण्यासाठी ही नैसर्गिक संसाधने महत्त्वपूर्ण आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.