राजावाडी रुग्णालयाचा पालिकेकडून पुनर्विकास; ७०० कोटींची ब्ल्यू प्रिंट तयार, बेड संख्या वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 11:05 AM2024-09-02T11:05:28+5:302024-09-02T11:07:25+5:30

कोरोनाच्या महासाथीत आलेल्या अनुभवातून धडा घेत मुंबई महापालिकेने घाटकोपर पश्चिमेतील राजावाडी रुग्णालयाच्या पुनर्विकासाची योजना तयार केली आहे.

in mumbai redevelopment of rajawadi hospital by municipality soon about 700 crore blueprint ready the number of beds will increase | राजावाडी रुग्णालयाचा पालिकेकडून पुनर्विकास; ७०० कोटींची ब्ल्यू प्रिंट तयार, बेड संख्या वाढणार

राजावाडी रुग्णालयाचा पालिकेकडून पुनर्विकास; ७०० कोटींची ब्ल्यू प्रिंट तयार, बेड संख्या वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोरोनाच्या महासाथीत आलेल्या अनुभवातून धडा घेत मुंबई महापालिकेने घाटकोपर पश्चिमेतील राजावाडी रुग्णालयाच्या पुनर्विकासाची योजना तयार केली आहे. त्यासाठी तब्बल ७०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 

राजावाडी रुग्णालयाची सुधारणा व क्षमता वाढविण्याच्या योजनेला महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे. हे रुग्णालय ६८ वर्षे जुने आहे. त्याचा पुनर्विकास दोन टप्प्यांत केला जाणार आहे. पुनर्विकासाची योजना तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यात आला असून, त्याला १४ कोटी रुपये दिले जाणार आहेत. या रुग्णालयातील बेडची संख्या सध्या ५०० असून, ती एक हजार २०० पर्यंत वाढवली जाणार आहे.  
मुंबई पूर्व उपनगरात मोठे रुग्णालय नाही. त्यामुळे कुर्ला ते मुलुंडपर्यंतच्या नागरिकांना सायन  येथील लोकमान्य टिळक रुग्णालय तसेच परळचे केईएम रुग्णालय गाठावे लागते.  सायन रुग्णालयाच्या विस्ताराचे काम सुरू आहे. तसेच राजावाडी रुग्णालयात रुग्णांना उपचारांसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते. तेथे सध्या  ५०० बेडची सुविधा आहे. परंतु, तेथे बाह्यरुग्ण विभागात दररोज तीन हजार रुग्ण येतात. तसेच दररोज ४०० रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जाते. वाढती रुग्णसंख्या पाहता रुग्णालयाचा विस्तार करावा, अशी मागणी रुग्णालयाकडून केली जात होती.

सध्याच्या सेवा सुरू ठेवून कामे-

राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास करताना तेथे सध्या सुरू असलेल्या रुग्णालयीन सेवांवर कोणताही परिणाम होऊ न देता कामे केली जाणार आहेत. ही कामे दोन टप्प्यांत केली जातील. यातील प्रत्येक टप्पा हा अडीच वर्षांचा असेल. कार्यादेश निघाल्यापासून पाच वर्षांत कामे पूर्ण केली जातील.

पाच चटई क्षेत्र निर्देशांकाचा वापर-

१) राजावाडी रुग्णालयाचे सध्याचे क्षेत्रफळ १६ हजार ८८३ चौरस मीटर आहे. 

२) ते एक लाख चार हजार ४४९ चौरस मीटर इतके वाढविले जाणार आहे. त्यासाठी पाच चटई क्षेत्र निर्देशांकाचा वापर केला जाणार आहे. 

३) आता सल्लागारांकडून तेथील इमारतीचा आराखडा, जागेचे सर्वेक्षण, माती परीक्षण, अग्निशमन यंत्रणा, निविदा प्रक्रिया याबाबत निश्चिती केली जाणार आहे.

Web Title: in mumbai redevelopment of rajawadi hospital by municipality soon about 700 crore blueprint ready the number of beds will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.