मोबाइल ॲपवरही करा एसटीचे आरक्षण; काय आहे प्रक्रिया, जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 11:34 AM2024-07-29T11:34:06+5:302024-07-29T11:40:01+5:30

आता MSRTC Bus Reservation या मोबाइलवर ॲपच्या माध्यमातूनही प्रवाशांना तिकीट काढता येते.

in mumbai reservation of st also on mobile app learn what the process is about bus ticket booking | मोबाइल ॲपवरही करा एसटीचे आरक्षण; काय आहे प्रक्रिया, जाणून घ्या 

मोबाइल ॲपवरही करा एसटीचे आरक्षण; काय आहे प्रक्रिया, जाणून घ्या 

मुंबई : एसटी महामंडळाची सेवा ही आता अधिकाधिक डिजिटली होऊ लागली आहे. घरबसल्या एसटीचे तिकीट काढण्यासाठी npublic.msrtcors.com या अधिक़ृत संकेतस्थळावरून तिकिटाचे ऑनलाइन आरक्षण करू शकता. त्याचबरोबर आता MSRTC Bus Reservation या मोबाइलवर ॲपच्या माध्यमातूनही प्रवाशांना तिकीट काढता येते. या दोन्ही पद्धतीद्वारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल केला आहे. संकेतस्थळ आणि ॲप हे अद्ययावत केले आहे. सध्या या ऑनलाइन आरक्षण प्रणालीव्दारे एसटीची दररोज १० हजार तिकिटे काढली जात आहेत.

२४ तास सेवा-

१) संकेतस्थळ आणि मोबाइल ॲप वापरण्यास सोपे व सुलभ आहे. या दोन्हींच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांगांना विविध सवलतींचे आगाऊ आरक्षण मिळू शकते.

२) यासाठी महामंडळाने npublic.msrtcors.com या संकेतस्थळाबरोबरच MSRTC Bus Reservation ॲपचा वापर प्रवाशांनी करावा, असे आवाहन केले आहे.

३) ऑनलाइन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी ७७३८०८७१०३ या क्रमांकावर संपर्क साधावा. ही सेवा २४ तास सुरू असते.

४) ऑनलाइन आरक्षण करताना पैसे भरून तिकीट न येणे (पेमेंट गेट वे संदर्भात) या तक्रारींसाठी ०१२०-४४५६४५६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येतो.

तिकीट विक्रीत वाढ-

खासगी गाड्यांच्या तुलनेत एसटी बसगाड्यांच्या सेवा अधिक चांगल्या असाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवनेरीसारख्या गाड्या एसटीने रस्त्यावर उतरविल्या आहेत.

ऑनलाइनद्वारे १ जानेवारी २०२४ ते २० मे २०२४ पर्यंत १२ लाख ९२ हजार तिकिटांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच काळात ९ लाख ७५ हजार तिकीट विक्री झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या सुमारे तीन लाखांनी जास्त आहे.

Web Title: in mumbai reservation of st also on mobile app learn what the process is about bus ticket booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई