'मेट्रो ३' च्या BKC ते कुलाबा टप्प्याला वेग; ८६% काम पूर्ण, मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 09:50 AM2024-08-05T09:50:56+5:302024-08-05T09:52:42+5:30

बहुप्रतीक्षित कुलाबा ते आरे मेट्रो ३ मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही वेग आला आहे.

in mumbai speed up bkc to colaba phase of metro 3 about 86 percent work completed mumbai citizens await a smooth journey | 'मेट्रो ३' च्या BKC ते कुलाबा टप्प्याला वेग; ८६% काम पूर्ण, मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार

'मेट्रो ३' च्या BKC ते कुलाबा टप्प्याला वेग; ८६% काम पूर्ण, मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार

मुंबई : बहुप्रतीक्षित कुलाबा ते आरेमेट्रो ३ मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही वेग आला आहे. या मेट्रो मार्गिकेतील बीकेसी ते कुलाबा या दुसऱ्या टप्प्यातील मार्गाचे ८६ टक्क्यांहून अधिक कामे पूर्णत्वास आली आहेत. त्यामुळे या मार्गाचे कामही पूर्ण होऊन तो लवकरच मुंबईकरांसाठी खुला होण्याची अपेक्षा आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. त्यावर एकूण २७ स्थानके असतील. पहिल्या टप्प्यात मेट्रो ३ मार्गिकेचा बीकेसी ते आरे हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या मार्गावर एकूण १० स्थानके असतील. एमएमआरसीने आरडीएसओ पथकाकडून या मेट्रो मार्गिकेची तपासणी करून घेतली आहे. आता कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस) कडून तपासणी केली जाणार आहे. सीएमआरएसकडून प्रमाणपत्र प्राप्त होताच पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.

दरम्यान, या मेट्रो मार्गिकेवरील दुसऱ्या टप्प्याच्या कामांनाही गती देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांची मिळून ९२.२ टक्के कामे पूर्ण झाली आहेत, तर सिव्हिलची कामे ९९.३ टक्के पूर्ण झाली आहेत.

सुरक्षा तपासणीला विलंब-

मेट्रो ३ चा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा मेपर्यंत प्रवाशांसाठी खुला केला जाईल, असे एमएमआरसीने जाहीर केले होते. मात्र या मार्गिकेच्या सुरक्षा तपासणीला विलंब झाला आहे. त्यामुळे हा मार्ग सुरू होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

मार्गिकेची स्थिती-

१) एकूण स्थानके - २७

२) पहिल्या टप्प्यात वाहतूक सुरू होणारी स्थानके - १०

३) आरे ते बीकेसी टप्प्याच्या कामाची स्थिती-९६.८ टक्के

४) बीकेसी ते कुलाबा टप्प्याचे काम ८५.९ टक्के

५) संपूर्ण प्रकल्पाचे काम - ९२.२ टक्के

६) संपूर्ण मार्गिकेचे सिव्हिल काम - ९९.३ टक्के

७) संपूर्ण मार्गिकेचे यंत्रणेचे काम - ७८ टक्के

८) सर्व स्थानकांचे बांधकाम - ९७.३ टक्के

Web Title: in mumbai speed up bkc to colaba phase of metro 3 about 86 percent work completed mumbai citizens await a smooth journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.