मुंबई : शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकानुसार परीक्षा न घेणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांच्या मनमानी कारभाराला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) चाप लावला आहे. उच्च शिक्षण संस्थांनी वेळेत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचा आदेश देण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.
'यूजीसी'चे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. विद्यापीठ अनुदान आयोग (विद्यापीठांनी पदवी आणि अन्य पुरस्कार देणे) नियमावली २००८ नुसार विद्यार्थी पात्र झाल्याच्या किंवा होणे अपेक्षित असल्याच्या तारखेपासून १८० दिवसांत पदवी शिक्षण, रोजगाराच्या संधी हुकतात.
काही उच्च शिक्षण संस्था वेळेत परीक्षा घेत नसल्याचे, तसेच पदवी व प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना देण्यास विलंब करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी हुकतात.
प्रदान केली पाहिजे, अशी तरतूद आहे. विद्यार्थी हक्कांबाबतच्या २०१२ मधील मार्गदर्शक सूचनांनुसार उच्च शिक्षण संस्थांनी माहिती पुस्तकातील शैक्षणिक वेळापत्रकात नमूद केल्यानुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन निकाल जाहीर केला पाहिजे. निकाल जाहीर झाल्यापासून १८० दिवसांत पदवी मिळणे हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे.