Join us  

विभागीय कर्मचाऱ्यांच्या कामावर आता अ‍ॅपमुळे प्रशासनाचा 'वॉच'; कामाचा आढावा घेणे सोपे होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 10:57 AM

घनकचरा व्यवस्थापन, इमारती, कारखान्यांच्या कामावर देखरेख.

लोकमत न्यूज नेटवर्क,मुंबई : मुंबईतील विविध प्रशासकीय वॉर्डातील परिरक्षण (मेंटेनन्स), घनकचरा व्यवस्थापन, इमारती आणि कारखाना विभागाच्या संबंधित कामकाजाचे सनियंत्रण आणि त्यात सुलभता आणण्याच्या उद्देशाने क्षेत्रीय कामकाजाची (फिल्ड वर्क) वास्तविक स्थिती जाणून घेण्यासाठी पालिकेने 'मायबीएमसी सचेत' अॅप्लिकेशन तयार केले आहे. सध्या हे अ‍ॅप्लिकेशन प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले असून, १ ऑक्टोबर २०२४ पासून ते संबंधित कर्मचाऱ्यांसाठी पूर्णवेळ उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारी, अधिकारी नियमितपणे फिल्ड वर्कवर असतात. या कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील पारदर्शकता, विश्वसनीयता आणि क्षेत्रीय कामकाजाच्या व्यवस्थापनात सुधारणा व्हावी, या उद्देशाने 'मायबीएमसी सचेत' अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.

पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच पालिकेच्या अपर आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या संकल्पनेनुसार माहिती तंत्रज्ञान विभागाने भौगोलिक माहिती तंत्रज्ञानावर (जीआयएस) आधारित 'मायबीएमसी सचेत' अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे.

१ ऑक्टोबरपासून कार्यान्वित-

सध्या हे मोबाइल अॅप्लिकेशन अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर आणि प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. लवकरच ते आयओएस प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध केले जाणार आहे. १ ऑक्टोबर २०२४ पासून ते संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी पूर्णवेळ उपलब्ध होईल, असे पालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

कामाचा आढावा घेणे सोपे-

१) विविध प्रशासकीय विभागांतील अधिकारी आपल्या दैनंदिन कामकाजाचा तपशील छायाचित्रांसह अॅप्लिकेशनमध्ये नोंदवू शकतील. त्यामुळे त्यांच्याकडे सुरू असलेले काम, त्यांनी पूर्ण केलेले काम आणि कामाची सद्यस्थिती आदींची माहिती क्षणार्धात उपलब्ध होऊ शकेल.

२) संबंधित विभागाचे सहायक आयुक्त, परिमंडळांचे उपायुक्त, पालिकेचे अपर आयुक्त, तसेच आयुक्त हे वेब अॅप्लिकेशन आणि डॅशबोर्डच्या माध्यमातून या संपूर्ण माहितीचा आणि कामकाजाचा आढावा

टॅग्स :मुंबईनगर पालिका