रेशनकार्ड आधारशी लिंक केले का? ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत शेवटची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 11:31 AM2024-06-18T11:31:28+5:302024-06-18T11:42:02+5:30

शासनाकडून दिले जाणारे शिधावाटप कार्ड आणि आधारकार्ड ही दोन्ही महत्त्वाची सरकारी कागदपत्रे आहेत.

in mumbai the government has extended the deadline for linking ration card and aadhaar card to 30 september 2024 | रेशनकार्ड आधारशी लिंक केले का? ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत शेवटची संधी

रेशनकार्ड आधारशी लिंक केले का? ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत शेवटची संधी

मुंबई : शासनाकडून दिले जाणारे शिधावाटप कार्ड आणि आधारकार्ड ही दोन्ही महत्त्वाची सरकारी कागदपत्रे आहेत. त्यामुळेच सरकारने रेशनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. ही कार्ड लिंक करण्याची मुदत ३० जून होती. मात्र आता अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ज्या कुटुंबांनी अद्याप दोन्ही कार्ड लिंक केली नसतील त्यांना सरकारने शेवटची संधी दिली आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३ नुसार, रेशनकार्ड आधारकार्ड लिंक करणे आवश्यक करण्यात आले आहे. पात्र कुटुंबांना अनुदानित दरात धान्य खरेदीचा लाभ मिळण्यासाठी रेशनकार्ड महत्त्वाचे असते. यापूर्वी सरकारने पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य केले होते. रेशनकार्ड आणि आधारकार्ड हे दोन्ही सरकारद्वारे जारी केलेले महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. ज्या कुटुंबांनी त्यांचे रेशनकार्ड आणि आधारकार्ड लिंक केलेले नसेल. तर सरकारने तुम्हाला एक शेवटची संधी दिली आहे. आधारकार्ड लिंक करण्याची यापूर्वीची अंतिम तारीख ३० जून होती. तपशील भरल्यानंतर तुम्ही दिलेल्या नंबरवर एक ओटीपी येईल. जो तुम्हाला भरून तुमचा ओटीपी कन्फर्म झाल्यानंतर तुमचे रेशनकार्ड तुमच्या आधारकार्डशी लिंक केले जाईल.

आधार, रेशनकार्ड कोणी जोडणे आवश्यक?

१) अंत्योदय अन्न योजनेंतर्गत लाभ घेत आहेत. त्यांच्यासाठी रेशनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करणे आवश्यक आहे.

२)  दोन्ही कार्ड लिंक केल्याने एकापेक्षा जास्त शिधापत्रिका घेण्यापासून रोखता येईल आणि गरिबांची ओळख पटवून रेशन सहज पोहोचवता येईल.

३) जर तुम्ही वेळेत रेशनकार्ड आधारकार्डशी लिंक केले तर तुम्हाला त्यासाठी एक रुपयाही देण्याची गरज नाही.

घरबसल्याही लिंक करता येणार-

घरातून लिंक करण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाइट food.wb.gov.in वर जावे लागेल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक तपशील उदा. आधारकार्ड क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक, तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक द्यावा लागेल.

Web Title: in mumbai the government has extended the deadline for linking ration card and aadhaar card to 30 september 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.