रेड अलर्ट गेला वाहून अन् सुट्टी गेली वाया...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 11:10 AM2024-07-10T11:10:19+5:302024-07-10T11:11:43+5:30

"सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय" या कवितेमधील अनुभव सोमवारच्या पावसाने जिवंत केला.

in mumbai the imd issued a red alert on yesterday and school were closed | रेड अलर्ट गेला वाहून अन् सुट्टी गेली वाया...

रेड अलर्ट गेला वाहून अन् सुट्टी गेली वाया...

मुंबई : "सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय" या कवितेमधील अनुभव सोमवारच्या पावसाने जिवंत केला. मंगळवारी रेड अलर्ट जारी झाल्याने शाळांना सुट्टी मिळाली. मात्र, पाऊसच पडला नाही. शाळांची सुट्टी वाया गेली अशी भावना शिक्षकांसह विद्यार्थी आणि पालक वर्गान व्यक्त केली. जुलै महिना उलटला तरी समाधानकारक पाऊस शहरात झाला नाही. परंतु मंगळवारी शहरात पावसाने दडी मारली. हवामान खात्याच्या रेड अलर्टमुळे शासनाने ठाणे शहरातील शाळांना सुट्टी जाहीर केली.

१) सकाळपासूनच विश्रांती  परंतु पाऊस पडलाच नाही. त्यामुळे सुट्टी वाया गेल्याची भावना शिक्षकांसह, पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सोमवारी रात्री काही प्रमाणात पाऊस सुरू झाला.

२) पहाटेपर्यंत कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारची सकाळ उजाडताच विश्रांती घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुट्टी वाया गेली.

३) बुधवारपासून शासनाची पायाभूत चाचणी सुरू होत आहे. त्याची तयारी मंगळवारी करायची होती, अशी खंत शिक्षकांनी व्यक्त केली.
आजचा दिवस वाया गेला.

नेमकी शाळा सुरू झाली आणि पावसामुळे मंगळवारी सुट्टी जाहीर झाली. बुधवारपासून शासनाची परीक्षा आहे. त्याचा मंगळवारी सराव झाला असता. पाऊस नसल्याने आजची सुट्टी वाया गेली. उद्याच्या चाचणीचा अभ्यास मुलांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवला आहे. - मंगला राठोड, सरस्वती सेकंडरी 

सुट्टी वाया गेल्याचे वाईट तर-

वाटतेच पण शासनाचा आदेश असल्यामुळे सुट्टी द्यावी लागते. पाऊस मुसळधार होता. त्यामुळे काही गाँधळ होऊ नये म्हणून सुट्टी जाहीर केली होती. उद्यापासून पायाभूत चाचणी परीक्षा असल्यामुळे मुलांकडून मंगळवारी तयारी करून घेणार होते. - पी. एम.
परदेशी, मुख्याध्यापक, थिराणी विद्यालय

शाळेचा एक दिवस वाया गेला. हल्ली कोणीही धोका पत्करायला तयार नसते. शासनाने सुट्टी जाहीर केल्यावर ती द्यावी लागते. पुंडलिक खामकर, मुख्य अध्यक्ष, शिव समर्थ सेवा मंडळ

सर्वच विद्यार्थी आणि शिक्षकांना सुट्टी देण्यात आली आहे. फक्त कार्यालयीन कर्मचारी शाळेत आले आहेत. - रेवती श्रीनिवासन, श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया, शाळा

शाळेला शासनाकडून सुट्टी जाहीर होताच व्हॉटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून त्यांना कळवले. ही सुट्टी दोन्ही सत्रातील शाळांना जाहीर करण्यात आली.- उज्ज्वला धोत्रे, डॉ. बेडेकर विद्यामंदिर

Web Title: in mumbai the imd issued a red alert on yesterday and school were closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.