पाण्यासाठी भगीरथ प्रयत्न! आता पाणी आणायचे कुठून? मुंबईकरांवर संकट!

By जयंत होवाळ | Published: June 24, 2024 09:36 AM2024-06-24T09:36:45+5:302024-06-24T09:39:54+5:30

मान्सूनने मुंबईत हजेरी लावली असली, तरी मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही.

in mumbai the water level in dam areas that supply water to not yet receive satisfactory rainfall citizens face to yet 5 % to 10% water cut | पाण्यासाठी भगीरथ प्रयत्न! आता पाणी आणायचे कुठून? मुंबईकरांवर संकट!

पाण्यासाठी भगीरथ प्रयत्न! आता पाणी आणायचे कुठून? मुंबईकरांवर संकट!

जयंत होवाळ, मुंबई : मान्सूनने मुंबईत हजेरी लावली असली, तरी मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. यंदा धरणांनी तळ गाठल्याने मुंबईकरांना ५ जूनपासून १० टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. कमी दाबामुळे होणारा पाणीपुरवठा, पाणीगळती, पाणीचोरी यामुळे नागरिक त्रस्त असतानाच आता शहर, उपनगरांत पाण्याचा खडखडाट जाणवत आहे. त्यामुळे मुंबईकरांना टैंकरशिवाय पर्याय उरलेला नाही. या सगळ्यामुळे महापालिका प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागत असले, तरी कोटींच्या घरातील लोकसंख्येच्या शहराची तहान भागवणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पालिका कर्मचाऱ्यांचे अफाट कष्ट यामागे आहेत. ही पाणीवितरण व्यवस्था नेमकी कशी आहे, यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप

कोणत्या धरणातील पाणी कोणत्या भागाला?

१) भातसा धरणातील पाणी पांजरापूर येथील जलशुद्रीकरण केंद्रात आणले जाते. त्यानंतर ते पूर्व उपनगर आणि शहरविभागाला पुरवले जाते.अप्पर वैतरणा धरणातील पाणी भांडुपच्या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केल्यानंतर त्याचा पश्चिम उपनगर आणि शहराच्या काही भागांत पुरवठा केला जातो.

२) विहार तलावातील पाणी कुर्ला परिसरात पोहोचवले जाते.

३) तुळशी तलावातील पाण्याचा पुरवठा आरे कॉलनी आणि गोरेगावच्या काही भागांना होतो.

४) पवई तलावातील पाण्याचा वापर होत नाही.

असे होते शुद्धीकरण-

१) शुद्धीकरण केंद्रात पाणी विविध प्रक्रियेद्वारे शुद्ध केले जाते. पॉली अॅल्युमिनियम क्लोराइड मिसळले जाते. हे पाणी मोठ-मोठ्या टाक्यांमधून नेऊन त्यास संथ होण्यासाठी अवधी दिला जातो. त्यामुळे गाळ, धूलिकण या मोठ्या टाक्यांच्या तळाशी बसतात. हा गाळ सतत टाक्यांमधून बाहेर काढला जातो.

२)  हे पाणी नंतर पूर्णतः गाळण्यासाठी रेतीचा थर असलेल्या टाक्यांमधून नेण्यात येते, पूर्णतः गाळलेले, शुद्ध झालेले पाणी फिल्टर बेडच्या तळातून काढून घेऊन निर्जंतुकीकरणासाठी पुढे नेण्यात येते.

३)  शुद्ध पाणी बऱ्याच लांबवर वाहून न्यायचे असल्याने निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीनचा वापर केला जातो. निर्जंतुकीकरण केलेले पाणी हे भांडुप संकुल आणि मुंबई बाहेरील वेवई येथील महासंतुलन जलाशयामध्ये सातवले जाते. हे पाणी संपूर्ण शहरातील २७ सेवा जलाशयांना पुरविले ने आते. हे आहे सुमारे ४५० किलोमीटर लांबीचे असून २४ तास कार्यान्वित असते. त्यामुळे भूजल सांडपाण्याने पेयजल दूषित होण्याची शक्यता टळते.

सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी राबतात हजारो हात-

१) सेवा जलाशयातून वाहिनीद्वारे पाणी विविध परिसरातील नागरिकांपर्यंत ३ लाख ६० हजार जलजोडण्यांद्वारे पोहोचविले जाते. या प्रणालीला तृतीय स्तर प्रणाली म्हणतात. त्यात दोन हजार ४०० मिलिमीटर ते १५० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांचा समावेश आहे.

२) तृतीय प्रणालीच्या जाळ्यांची अंदाजित लांबी सुमारे पाच हजार कि. मी. आहे. त्यामध्ये सुमारे २५ किमी लांबीच्या जलबोगद्यांचा समावेश आहे. मुंबईतील दररोजचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी सुमारे एक हजार झडपांची उघडझाप केली जाते. पाणीपुरवठा सुरळीतपणे चालू राहण्यासाठी दररोज सुमारे एक हजार १५० अभियंते, आठ हजार ९५० कामगार व इतर कर्मचारी अव्याहतपणे कार्यरत असतात.

असे आणले जाते पाणी-

मुंबईला पाणीपुरवठाकरणारी बहुतांश धरणे ही मुंबईपासून सुमारे २०० किमी अंतरावर आहेत. तेथून मुंबईतील जलशुद्रीकरण केंद्रांपर्यंत पाणी वाहून आणण्याचे काम दोन हजार २३५ मि.मी. ते तीन हजार मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे व पाच हजार ५०० मिलिमीटर व्यासाच्या काँक्रीटच्या भूमिगत जलबोगद्याच्यासाहाय्याने गुरुत्वाकर्षणाद्वारे सुमारे ५० टक्के पाणी है उदंचन व्यवस्थेद्वारे जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत आणले जाते.

७५० दशलक्ष लिटर पाण्याची होते चोरी,गळती-

जलबोगदे आणि जुन्या जलवाहिन्या बदल्यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आल्याने पाणी गळती आणि चोरीच्या प्रमाणात काही प्रमाणात घट झाली आहे. मुंबईत रोज ७५० दशलक्ष लिटर एथत्या पाण्याची गळती आणि चोरी होते, असा अंदाज आहे. म्हणजे पुणे शहराला जेवढे पाणी लागते. तेवढ्या पाण्याचामुंबईत अपव्यय होतो.

१) भातसा धरण-

ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील साजवली गावाजवळ बांधलेले आणि मुंबईस पाणीपुरवठा करणारे हे एक महत्त्वाचे धरण आहे. हे धरण भातसा व चोरणा या नद्यांच्या संगमावर बांधले आहे. है धरण शहापूरपासून २० किलोमीटरवर आहे. धरणाचे बांधकाम १९६९ मध्ये सुरु झाले. त्यावेळी १४ कोटी रुपये एवडा खर्चाचा अंदाज होता. डिसेंबर १९८३ पर्यंत या प्रकल्पाचा खर्च ८० कोटी रुपयांवर, तर १९९४-९५ पर्यंत हा खर्च ३५८ कोटी रुपयांवर पोहोचला. २००० सालापर्यंत काम पूर्ण झाले. मुंबई शहराला ५० टक्के पाणीपुरवठा वा धरणातून होतो.

२) तानसा-

तानसा धरष्ण शहापूर तालुक्यात आहे. या धरण क्षेत्रात वार्षिक सरासरी दोन हजार ५०० मिलीमीटर एयहा पाऊस पडतो. २८७२-१८९० या कालावधीत धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.

३) विहार तलाव-

 विहार तलाव हा मिठी नदीवरील उत्तर मुंबईत विहार गावाजवळ बोरीवली राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात आहे. याचे बांधकाम १८५६ माये सुरू झाले आणि १८६० मध्ये पूर्ण इराले. हा तलाच मुंबईतील सर्वांत मोठा तलाव असल्याचे मानला जातो. या तलावातून मुंबईला दररोज तीन टक्के पाणी मिळते,

४) मध्य वैतरणा-

 वैतरणा नदी ही पालघर जिल्ह्यातून वाहते. ही नदी त्र्यंबकेश्वरत्रचळ सह्याद्री पर्वतात उगम पावते. ठिकाणी तीन धरणे आहेत. पहिलेखालचे वैतरणा धरण (मोडक सागर)
आणि मध्य वैतरणा धरण, तिसरेइगतपुरीजवळ अप्पर वैतरणा धरण.या तीनही धरणांतून मुंबईलापाणीपुरवठा होतो, या नदीच्या सूर्या,पिंजाळ, तानसा आणि देहेरजा या प्रमुख उपनद्या आहेत.

५)  पवई तलाव-

पवई गावातील झोपड्या हलविल्यानंतर तिथे कृत्रिम तलाव तयार करण्यात, पवई तलाव बांधण्यापूर्वी तेथील जागा २७९९ मध्ये डॉ. स्कॉट यांना वार्षिक भाडेपट्टीसाठी देण्यात आली होती. स्कॉट यांच्या मृत्यूनंतर ती जागा १८१६ मध्ये सरकारने आपल्या अखत्यारित घेतली आणि १८२६ मध्ये ती पुन्हा अॅग्रिकल्चर अॅड हॉल्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाचे व्हाइस प्रेसिडंट फ्रामजी कावसजी यांना भाडेपट्टीवर दिली.

त्यानंतर १८९१ मध्ये तिथे तलाव बांधण्यात आला, तेव्हा त्या तलावाला फ्रामजी कावसजी यांचे नाव दिले गेले. पवई गावाला पाणीपुरवठा करण्याची गरज भासू लागली, तेव्हा मिठी पूर्व-उत्तर- पश्चिमेला असलेल्या डॉगरावरून वाहत येणारे पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी आणि दुष्काळी काळात मुंबईला त्याचा पाणीपुरवता करण्यासाठी या धरणाची निर्मिती करावी, असा प्रस्ताव १८८९ मध्ये मांडण्यात आला. मात्र, कालांतराने तलावात सांडपाणी, झाडे, फुले, कचरा, कंद, तण आणि मोठ्या प्रमाणात वाहून आणलेला गाळ साधला गेल्याने १८९० मध्ये पिण्यासाठी पाण्याचा पुरववा करण्यावर बंदी घातली गेली.

Web Title: in mumbai the water level in dam areas that supply water to not yet receive satisfactory rainfall citizens face to yet 5 % to 10% water cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.