मुंबईत 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद, जलवाहिनीची दुरुस्ती!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 01:02 PM2023-10-28T13:02:02+5:302023-10-28T13:03:26+5:30
महानगरपालिकेतर्फे के-पूर्व विभागामध्ये जलवाहिनी जोडण्याचे तसेच स्ट्रक्चरल ऑडिटचे काम हाती घेतले जाणार असल्याने ३१ ऑक्टोबर रोजी के-पूर्व, के-पश्चिम आणि पी-दक्षिण विभागातील पाणीपुरवठा १५ तासांसाठी बंद राहणार आहे.
महानगरपालिकेतर्फे के-पूर्व विभागामध्ये जलवाहिनी जोडण्याचे तसेच स्ट्रक्चरल ऑडिटचे काम हाती घेतले जाणार असल्याने ३१ ऑक्टोबर रोजी के-पूर्व, के-पश्चिम आणि पी-दक्षिण विभागातील पाणीपुरवठा १५ तासांसाठी बंद राहणार आहे.
के-पूर्व विभाग येथील महाकाली गुंफा मार्गावरील रम्य जीवन हाऊसिंग सोसायटीजवळ तसेच कार्डिनल ग्रेसीयस मार्ग व बी.डी.सावंत मार्ग चौक, अंधेरी पूर्व येथे नवीन १ हजार ५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी तसेच १ हजार २०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ३१ ऑक्टोबरला सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत पाणीपुरवठा बंद असेल.
पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर कोणता?
के-पूर्व विभाग: त्रिपाठी नगर, मुंशी कॉलनी, बस्तीवाला कम्पाऊंड, कलेक्टर कॉलनी, दुर्गा नगर, मातोश्री क्लब, जोरेश्वरी पूर्व, दत्त टेकडी, ओबेरॉय स्प्लेंडर, केल्टी पाडा, गणेश मंदिर (जेव्हीएलआर) जवळचा परिसर, बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी आणि लगतचा परिसर
पी-दक्षिण विभाग: राम मंदिर, गोरेगाव पश्चिम (पाणीपुरवठा बंद), बिंबीसार नगर (कमी दाबाने पाणीपुरवठा)
के पश्चिम विभाग: जोगेश्वरी स्थानक मार्ग, एस.व्ही.मार्ग, साब्री मशीद ते जेव्हीएलआर जंक्शन, मोरागाव, जुहू गावठाण, सांताक्रूझ पूर्व, यादव नगर, कै. सावंत मार्ग, सहकार मार्ग, बांदिवली हिल.
पाणीपुरवठा वेळेत बदल
के पश्चिम विभाग एस व्ही मार्ग, व्ही.पी मार्ग, जुहू गल्ली, उपासना गल्ली, स्थानक मार्ग या परिसरात १ नोव्हेंबरपासून सातेसात ते दुपारी १२ वाजून ५० मिनिटे या वेळेत पाणीपुरवठा केला जाईल. १ नोव्हेंबरपासून सकाळी साडेसात ते दुपारी १२ वाजून ५० मिनिटे या वेळेत पाणीपुरवठा केला जाणार.