आता ‘दीवार’ रोखणार दरडी; झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 11:34 AM2024-06-20T11:34:55+5:302024-06-20T11:37:22+5:30

ऐन पावसाळ्यात दरडीचा भाग कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये लगतच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांचा नाहक बळी जातो.

in mumbai the work of erecting a protection wall through the mhada mumbai slum improvement board is underway | आता ‘दीवार’ रोखणार दरडी; झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू

आता ‘दीवार’ रोखणार दरडी; झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू

मुंबई : ऐन पावसाळ्यात दरडीचा भाग कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये लगतच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांचा नाहक बळी जातो. या घटनांना आळा घालण्यासाठी म्हाडाने ठिकठिकाणी दरडीच्या ठिकाणी संरक्षण भिंती बांधल्या आहेत.

म्हाडाच्यामुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत डोंगर उतारांवरील भागांमध्ये संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू आहे. लोकप्रतिनिधींच्या माध्यमांतून हे काम केले जात आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. कोणत्या शासकीय किंवा निमशासकीय संस्थेमार्फत काम करायचे आहे? हे लोकप्रतिनिधींकडून ठरविले जाते. त्यानुसार याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली जाते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या संदर्भातील निधी संबंधित संस्थेला वितरित केला जातो किंवा वळता केला जातो. त्यानंतर हे काम केले जाते. मालाड पूर्वेकडील मानस मोती इमारतीजवळ, दहिसर पूर्व येथील केतकीपाडा या ठिकाणी संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाल्याची माहिती म्हाडाने दिली.

Web Title: in mumbai the work of erecting a protection wall through the mhada mumbai slum improvement board is underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.