मुंबई : बनावट विमान तिकिटासह सहार आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लॉबीमध्ये शिरलेल्या व्यक्तीला सोमवारी अटक करण्यात आली. उसामा मोहम्मद मोमीन असे या व्यक्तीचे नाव आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, उसामा सहार विमानतळामधून बाहेर पडण्यासाठी निर्गमन गेट क्रमांक ३ जवळ आला होता. अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता त्याने एअर इंडियाचे मुंबई ते नागपूरचे टर्मिनल २ चे तिकीट रद्द केले असून मित्रासोबत प्रवास करणार असल्याचे सांगितले. त्याच्याकडील तिकिटाबाबत संशय आल्याने एअर इंडियाच्या काउंटरवर चौकशी करण्यात आली. तेव्हा ते बनावट असल्याचे उघड झाले.
नातेवाइकांना सोडायला आलेलो !
एअर इंडियाच्या विमानाने जेद्दाह येथे चाललेल्या दोन नातेवाईक महिलांना सोडायला आपण विमानतळावर बनावट तिकीट घेऊन आल्याचे उसामाने चौकशीत सांगितले.