मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरीत सोमवारी पाणी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 10:38 AM2024-08-31T10:38:16+5:302024-08-31T10:40:05+5:30
सोमवारी ‘के पूर्व’ आणि ‘के पश्चिम’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क,मुंबई : महापालिकेकडून सोमवार, २ सप्टेंबरला ‘के पूर्व’ विभागात वेरावली जलाशय २ येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या आगम वाहिनीवरील व्हॉल्व्ह (झडपा) बदलण्याचे काम मध्यरात्री १ वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या १२ तासांमध्ये ‘के पूर्व’ आणि ‘के पश्चिम’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर ‘के पूर्व’ विभागातील काही परिसरांत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
के पूर्व विभाग-
मजास गाव, समर्थनगर, सर्वोदयनगर, इंदिरानगर, जनता वसाहत, हिंदनगर, दत्त टेकडी, शिव टेकडी, प्रतापनगर, श्यामनगर, मजास बस आगार, मेघवाडी, प्रेमनगर, वांद्रे भूखंडाचा काही भाग, रोहिदासनगर, गांधीनगर, आर. आर. ठाकूर मार्ग, आनंदनगर, ओबेरॉय टॉवर, जोगेश्वरी रेल्वे स्थानक पूर्व ते पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यानचा परिसर, नटवरनगर, पी. पी. डायस कंपाउंड. महाकाली मार्ग, पूनम नगर, गोनीनगर, तक्षशिला मार्ग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण वसाहत, दुर्गानगर, पेपर बॉक्स, मालपा डोंगरी क्रमांक ३, शेर-ए-पंजाब, बिंद्रा संकुल, हंजरनगर, गणेशनगर, शोभना परिसर, सुंदर नगर, गौतमनगर, मॉर्डन बेकरी, प्रजापूरपाडा, त्रिपाठीनगर, मुन्शी वसाहत, बस्तीवाला वसाहत, जिल्हधिकारी वसाहत, सारिपूतनगर, दुर्गानगर, मातोश्री क्लब दत्त टेकडी, ओबेराय स्प्लेंडर, केलतीपाडा, गणेश मंदिर परिसर, जोगेश्वरी विक्रोळी जोड मार्ग, बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानीपाडा, सुभाष मार्ग, चाचानगर, वांद्रे वसाहत, हरीनगर, शिवाजीनगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी.
के पश्चिम विभाग -
सी. डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय मार्गिका, स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकूशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी बाजार, भर्डावाडी, नवरंग चित्रपटगृहाच्या मागे, अंधेरी गावठाण, आंब्रे उद्यान पंप व गझधर पंप, गिलबर्ट हिल (भाग), तीन नळ, गावदेवी डोंगरी मार्ग, उस्मानिया डेअरी परिसर, पटेल इस्टेट, वैशालीनगर, सौराष्ट्र पटेल इस्टेट, अमृत नगर, अजित ग्लास उद्यान, आक्सा मस्जिद मार्ग, बेहराम बाग मार्ग, गुलशननगर, राघवेंद्र मंदिर मार्ग, रिलीफ मार्ग, हरियाणा बस्ती, देवराज चाळ, जयराज चाळ, घारवाला डेअरी, स्वामी विवेकानंद मार्ग ते जोगेश्वरी बस आगार, चार बंगला, डी. एन.नगर, जुहू-वेसावे जोड रस्ता, गणेशनगर, कपासवाडी, भारतनगर, सात बंगला आंबोळी, म्हातारपाडा, राज कुमार, आझाद नगर-१,२,३, दत्ता साळवी मार्ग, जीवननगर, नवीन जोड रस्ता, पंचम सोसायटी, अंधेरी औद्योगिक वसाहत, फन रिपब्लिक मार्ग, सरोटा पाडा, अपना बाजार, सहकारनगर, वीरा देसाई मार्ग (भाग), कॅप्टन सामंत मार्ग, अग्रवाल वसाहत, हिल पार्क, हनुमान मंदिर मार्ग, प्रथमेश संकुल, कुरेशी कंपाउंड, विकासनगर, क्रांतीनगर, कदमनगर, काजू पाडा, आनंदनगर, आर.सी. पटेल चाळ, पारसी वसाहत, शक्तीनगर, शुक्ला वसाहत आदी.