Join us  

एका घरासाठी आले ५६ अर्ज; म्हाडाच्या २ हजार घरांची सव्वालाख अर्जदारांना आस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 9:43 AM

म्हाडाच्या २ हजार ३० घरांच्या लॉटरीला अर्जदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, १ लाख ३४ हजार ३५० अर्ज प्राप्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :म्हाडाच्या २ हजार ३० घरांच्या लॉटरीला अर्जदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, १ लाख ३४ हजार ३५० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी १ लाख १३ हजार ८११ अर्जदारांनी अद्यापपर्यंत अनामत रकमेचा भरणा करून लॉटरीतील सहभाग निश्चित केला. तर, म्हाडाकडे अनामत रक्कमेतून ५३० कोटी रुपये जमा झाले असून, एका घरासाठी सरासरी ५६ हून अधिक अर्ज आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे, असे म्हाडाने सांगितले.

कुर्ला, ओशिवरा, गोरेगाव, विक्रोळी, भुलेश्वर, दिंडोशी येथील घरांना जास्त मागणी असून, भुलेश्वर विभाग वेलकर स्ट्रीट या योजनेंतर्गत एका सदनिकेकरिता ५३३ अर्ज प्राप्त झाले. यापैकी ४२२ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला.

लॉटरीचे विभाजन तीन गटांमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये बांधकाम चालू असलेल्या गटामध्ये १३२७ सद‌निकांचा समावेश आहे.

१) कुर्ला : कुर्ला या योजनेतील १४ सदनिकांकरिता एकूण ४०२६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ३१२४ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे.

२) ओशिवरा : ओशिवरा येथील योजनेतील एका सदनिकेकरिता एकूण ७६५ अर्ज प्राप्त झाले आहेत, यापैकी ५४६ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला

३) गोरेगाव : सिद्धार्थ नगर, गोरेगाव येथील २ सदनिकांकरिता एकूण ७४९ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ६०२ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे.

४) विक्रोळी: कन्नमवार नगर, विक्रोळी या योजनेतील २ सदनिकांकरिता एकूण ६२० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ४४६ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे.

५) भुलेश्वर : भुलेश्वर विभाग वेलकर स्ट्रीट या योजनेंतर्गत एका सदनिकेकरिता ५३३ अर्ज प्राप्त झाले असून, यापैकी ४२२ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला.

६) दिंडोशी : म्हाडातर्फे नव्याने बांधकाम चालू असलेल्या गटामध्ये शिवधाम जुनी दिंडोशी, म्हाडा कॉलनी मालाड या योजनेतील एका सदनिकेकरिता ४१९ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी २९१ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला.

४५ सदनिकांसाठी ११ हजार अर्ज -

जुनी दिंडोशी : शिवधाम कॉम्प्लेक्स जुनी दिडोशी, म्हाडा कॉलनी मालाड या योजनेतील ४५ सदनिकांकरिता ११,२८० अर्ज प्राप्त झाले आहेत. ९,५१९ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला.

उत्पन्न गट निहाय किती अर्ज आले-

१) अत्यल्प- ३५९ सदनिकांकरिता ५०,९९३ अर्ज, ४७,१३४ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली. 

२) अल्प- ६२७ सदनिकांकरिता ६१,५७१ अर्ज, ४८,७६२ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली.

३) मध्यम- ७६८ सदनिकांकरिता १४,२९३ अर्ज, २१,४६१ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली. 

४) उच्च- २७६ सदनिकांकरिता ७४९३ अर्ज, ६४५४ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली.

टॅग्स :मुंबईम्हाडा