Join us  

अंधेरीत गुरुवार, शुक्रवारी पाणी नाही; पार्ले-वर्सोवा वाहिनीवर दुरुस्तीचे काम करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 11:24 AM

मुंबई महापालिकेच्या के पूर्व विभागातील वेरावली जलाशय-२ येथे गुरुवार व शुक्रवारी पार्ले-वर्सोवा वाहिनीवर चार व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पालिकेच्या के पूर्व विभागातील वेरावली जलाशय-२ येथे गुरुवार व शुक्रवारी पार्ले-वर्सोवा वाहिनीवर चार व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्तीमुळे के पूर्व आणि के पश्चिम विभागातील अंधेरी गावठाण, गौतमनगर, अंधेरी मार्केट आणि अन्य काही भागांचा पाणीपुरवठा या दुरुस्ती काळात बंद राहणार असल्याचे आता पालिकेकडून कळविण्यात आले आहे. गुरुवार, १९ सप्टेंबर रात्री ८ वाजल्यापासून ते शुक्रवार, २० सप्टेंबर दुपारी २ वाजेपर्यंत हे काम केले जाणार आहे.

पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा. पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे. 

तसेच पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आऊटलेट दुरुस्तीनंतर नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा पूर्ववत होईल.

या भागांना बसणार फटका-

के पूर्व - महाकाली मार्ग, पूनमनगर, गोनीनगर, तक्षशिला मार्ग, एमएमआरडीए वसाहत, दुर्गानगर, पेपर बॉक्स, मालपा डोंगरी क्रमांक ३, शेर ए पंजाब, बिंद्रा संकुल, हंजरनगर, गणेशनगर, शोभना परिसर, सुंदरनगर, गौतमनगर, मॉडर्न बेकरी, प्रजापूरपाडा, त्रिपाठीनगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कम्पाऊंड, अचानक कॉलनी, कलेक्टर कम्पाऊंड, सारीपूतनगर, दुर्गानगर, मातोश्री क्लब

के पश्चिम - सी. डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी मार्केट, भर्डावाडी, नवरंगच्या मागे, अंधेरी गावठाण आदी काही भाग.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापाणीकपातपाणीविलेपार्लेवर्सोवा