वेगवान डिलिव्हरी बॉयना ‘ब्रेक’; वाहतूक पोलिसांची ई-बाइक चालकांवर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 10:56 AM2024-09-16T10:56:10+5:302024-09-16T11:01:40+5:30

ई-बाइक येण्याआधीही ऑनलाइन सेवा पुरवठादार कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉयच्या दुचाकी वाहतुकीत डोकेदुखी ठरत होत्या.

in mumbai traffic police has stepped up action against e bike drivers of online service provider companies for violating traffic rules | वेगवान डिलिव्हरी बॉयना ‘ब्रेक’; वाहतूक पोलिसांची ई-बाइक चालकांवर कारवाई 

वेगवान डिलिव्हरी बॉयना ‘ब्रेक’; वाहतूक पोलिसांची ई-बाइक चालकांवर कारवाई 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : खाद्यपदार्थ, तसेच विविध वस्तूंची झटपट डिलिव्हरी करण्यासाठी ऑनलाइन सेवा पुरवठादार कंपन्यांचे ई-बाइक चालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याने त्यांच्याविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईचा वेग वाढविला आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे त्यांना ब्रेक लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ई-बाइक येण्याआधीही ऑनलाइन सेवा पुरवठादार कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉयच्या दुचाकी वाहतुकीत डोकेदुखी ठरत होत्या. कमीत कमी वेळेत पदार्थ, वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवताना त्यांच्याकडून सर्रास नियमभंग होत आहे. त्यात मोटार वाहन कायदा लागू नसल्याने काही ई-बाइकस्वार कर्मचारी आणखी मोकाट झाले होते. सिग्नल न पाळणे, हेल्मेट न वापरणे, नो-एंट्रीत शिरणे, चुकीच्या बाजूने दुचाकी चालवणे, मर्यादेपेक्षा वेगाने दुचाकी हाकणे या नियमभंगांबाबत वाहतूक पोलिसांकडे तक्रारी येत होत्या. त्यानुसार, वाहतूक पोलिसांनी थेट कारवाईला सुरुवात केली. हजारो दुचाकीस्वारांविरुद्ध गुन्हे नोंदवत त्यांच्या ई-बाइक थेट जप्त केल्या आहेत.

येथे करा तक्रार-

वाहतूक नियम मोडणारे ई-बाइकस्वार आढळल्यास मुंबई वाहतूक पोलिसांच्या ८४५४९९९९९९ या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहनही वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

कंपन्यांना नोटीस-

ऑनलाइन सेवा पुरवठादार कंपन्यांनाही नोटीस जारी करून दुचाकीद्वारे विशेषतः ई-बाइकद्वारे पार्सल पोहोचवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण आणून त्यांना वाहतूक नियम पाळण्याच्या सूचना करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

स्वतःसह नागरिकांच्या जिवाला धोका-
 
ई-बाइक चालक स्वतःच्या जिवाबरोबर नागरिकांच्याही जिवाला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने वाहन चालवत आहेत. अनेकदा लवकर पोहोचण्याचा नादात चुकीच्या मार्गानेही वळण घेताना दिसत आहेत. 

Web Title: in mumbai traffic police has stepped up action against e bike drivers of online service provider companies for violating traffic rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.