अक्षयकुमारच्या नावे दिगंगनाने पैसे उकळले; निर्मात्यांची अंबोली पोलिसांत तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 11:19 AM2024-06-11T11:19:11+5:302024-06-11T11:24:05+5:30

एमएच फिल्म्सने अभिनेते राकेश बेदी, सूर्यवंशी यांचे फॅशन डिझायनर कृष्ण परमार यांना मानहानीची नोटीस बजावली आहे.

in mumbai tv actress digangana suryavanshi extorted money use name of akshay kumar producers complaint to amboli police | अक्षयकुमारच्या नावे दिगंगनाने पैसे उकळले; निर्मात्यांची अंबोली पोलिसांत तक्रार 

अक्षयकुमारच्या नावे दिगंगनाने पैसे उकळले; निर्मात्यांची अंबोली पोलिसांत तक्रार 

मुंबई : अभिनेत्री झीनत अमान यांची आगामी मालिका ‘शोस्टॉपर’च्या निर्मात्यांनी अभिनेत्री दिगंगना सूर्यवंशीविरुद्ध फसवणूक आणि  विश्वास भंग केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अभिनेता अक्षयकुमारला एका प्रकल्पासाठी सादरकर्ता म्हणून नियुक्त केल्याचा खोटा दावा करत ७५ लाख रुपयांची भरीव रक्कम आणि मर्सिडीज कारची मागणी केल्याचा आरोप सूर्यवंशीवर आहे.

एमएच फिल्म्सने अभिनेते राकेश बेदी, सूर्यवंशी यांचे फॅशन डिझायनर कृष्ण परमार यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. ज्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म सहयोग करण्यास इच्छुक नसल्याबद्दल खोटी सार्वजनिक विधाने केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे, ज्यामुळे प्रकल्पाची प्रतिष्ठा खराब झाली. प्रकल्प रखडला होता आणि देयके रोखण्यात आली होती, असे सांगून त्यांनी मीडियाची दिशाभूल केली. दिगंगनाने तिच्या मागण्या पूर्ण न केल्यास हरिशंकरला परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. 

हरिशंकरने आयपॅडवर सर्व एपिसोड पाठवले-

१)  दिगंगनाने हरिशंकरला सांगितले की, तिचे सुपरस्टारशी बोलणे झाले असून त्याच्या कार्यालयातील दोन सदस्यांना हा शो पाहण्यात रस आहे. 

२)  दोन व्यक्तींनी त्याच्या ऑफिसला भेट देत अक्षयकुमारला हा शो पाहायचा असल्याचे सांगितले. त्यावेळी अक्षय अजमेरमध्ये शूटिंग करत असल्याने हरिशंकरने दिगंगना आणि त्याच्या संपादकाला आयपॅडवर सर्व एपिसोडसह अजमेरला पाठवले. 

... आणि ती सतत बहाणे बनवू लागली!

संपादक अक्षयला अजमेरमध्ये थोडक्यात भेटला, पण दिगंगनाने त्याच्याकडून एपिसोडचे फुटेज घेत ते अक्षयला  दाखवण्यासाठी एकटीच गेली. कथितपणे, तिने आयपॅड परत केला नाही आणि हरिशंकरला सादरकर्ता म्हणून अक्षयचे नाव वापरायचे असल्यास त्याने सहा कोटी रुपये आगाऊ मागितले आहेत असे सांगितले. मात्र, अक्षयसोबत निदान फोनवर तरी बोलणे करून दे, असे सांगितल्यावर ती सतत बहाणे बनवू लागली. अखेर तिच्या विरोधात तक्रार देण्यात आली.

Web Title: in mumbai tv actress digangana suryavanshi extorted money use name of akshay kumar producers complaint to amboli police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.