अंत्यविधीसाठी दोन-दोन तास वेटिंग... सुशोभीकरणाच्या खर्चाची ‘राख’, समस्या सुटणार तरी कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 09:52 AM2024-08-06T09:52:00+5:302024-08-06T09:55:31+5:30
वरळी येथील माता रमाबाई आंबेडकर स्मशानभूमीचे अडीच वर्षे चाललेले सुशोभीकरण डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण झाले.
प्रतिज्ञा पवार, मुंबई : वरळी येथील माता रमाबाई आंबेडकर स्मशानभूमीचे अडीच वर्षे चाललेले सुशोभीकरण डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण झाले. मात्र, पूर्वीच्या समस्या कायम असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. जुन्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी आठ जागा उपलब्ध होत्या.
आता सरणावर अंत्यसंस्कारासाठी दोन आणि विद्युतदाहिनी, अशा तीन जागाच उपलब्ध आहेत. परिसरातील पार्थिव येथे अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. त्यामुळे काही वेळा अंत्यसंस्कारासाठी दोन-दोन तास वेटिंग करावे लागते.
सुशोभीकरणावर केलेला खर्च वाया गेल्याची नागरिकांची भावना आहे. स्मशानभूमीतील समस्यांविरोधात वरळीमध्ये विविध पक्षीय कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले आहे. मात्र, पालिकेकडून आश्वासनांशिवाय काहीच मिळत नसल्याचे उद्धवसेनेचे पदाधिकारी अभिजित पाटील यांचे म्हणणे आहे.
८ एकरवर स्मशानभूमी-
१) आठवड्याला १० ते १२ अंत्यसंस्कार.
२) ११ कर्मचारी कार्यरत आहेत.
३) सरणावर अंत्यसंस्कारासाठी दोन, विद्युतदाहिनीमध्ये १ जागा.
४) विद्युतदाहिनी बरेचदा बंद असते.
५) निधीच्या कमतरतेमुळे काम अर्धवट.
६) धूर कोंडून राहत असल्याने त्रास.
७) गैरसोयींबाबत सहायक आयुक्त मृदुला अंडे यांचीही दिलगिरी.