Join us

वर्सोव्यात आता होडीतून प्रवास करायचा का? युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे अनोखे आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 1:12 PM

नालेसफाईवर यंदा तब्बल २६० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत.

मुंबई : नालेसफाईवर यंदा तब्बल २६० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. एवढे करूनही संपूर्ण मुंबईची तुंबई झाली असून, त्याला राज्य सरकार व मुंबई महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी वर्सोवा येथे  होड्यांमधून प्रवास केला.

मुंबईत पाणी तुंबू नये, यासाठी विविध उपाययोजनांवर करदात्या मुंबईकरांचे आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. यात भूमिगत टाक्या वाढविण्यासह पर्जन्य जलवाहिन्यांचे आकारमान वाढवणे, समुद्र किनाऱ्यावर शक्तिशाली पंप बसवणे व अन्य कामांचा समावेश आहे.  मात्र त्याचा उपयोग झालेला नाही.

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अंधेरी पश्चिमेतील वीरा देसाई रोड, कंट्री क्लबजवळ, वर्सोवा विधानसभा मतदारसंघामध्ये तुंबलेल्या पाण्यातून चक्क वेसावे कोळीवाड्यातून दोन लहान होड्यांमधून प्रवास करत अनोखे आंदोलन केले. मुंबई युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सुफियान हैदर, राष्ट्रीय समन्वयक प्रियंका सानप, उत्तर पश्चिम युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रतिश तिवारी, मुंबई युवक काँग्रेस सचिव सूरज खोत आणि वर्सोवा विधानसभा युवक काँग्रेसचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकावर्सोवापाऊसकाँग्रेसअंधेरी