हवामान खात्याचे अंदाज हवेतच; अंदाज चुकल्यानंतर सोशल मीडियावर पडतो ‘जोक्स’चा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 11:29 AM2024-07-17T11:29:47+5:302024-07-17T11:33:59+5:30

दरवर्षीच्या पावसाळ्यात हवामान खात्याकडून बांधले जाणारे अंदाज कधी चुकतात तरी कधी बरोबर येतात.

in mumbai weather forecast by imd during monsoon jokes on social media by users after the guess is wrong | हवामान खात्याचे अंदाज हवेतच; अंदाज चुकल्यानंतर सोशल मीडियावर पडतो ‘जोक्स’चा पाऊस

हवामान खात्याचे अंदाज हवेतच; अंदाज चुकल्यानंतर सोशल मीडियावर पडतो ‘जोक्स’चा पाऊस

मुंबई : दरवर्षीच्या पावसाळ्यात हवामान खात्याकडून बांधले जाणारे अंदाज कधी चुकतात तरी कधी बरोबर येतात. अंदाज चुकल्यानंतर सोशल मीडियासह नागरिकांकडून हवामान खात्यावर जोक्सचा पाऊस पडतो. 

हल्ली तर सोशल मीडियावर बहुतांश अकाउंटसहून हवामानाचे अंदाज दिले जातात. मात्र, हे हवामानाचे अंदाज वर्तविण्याबाबत संबंधितांकडून कोणते प्रोडक्ट वापरले जातात? याची माहिती नाही किंवा यावर बोलण्याऐवजी हवामान खात्याकडून याची इत्यंभूत माहिती दिली जाते. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी  हवामान खात्याचे ॲप असून, संकेतस्थळावरील माहितीचा नागरिकांनी वापर करावा, याकडे हवामान खात्याने लक्ष वेधले आहे. पावसाच्या दिवसांत बदल झाले आहेत. आता पाऊस सलग लागून राहत नाही. तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त पावसाचे प्रमाण अधिक असते. कधी आठवडाभर पाऊस पडत नाही, तर कधी तीन तीन तास सलग पाऊस पडत असतो. पालिका, विमानतळ उर्वरित यंत्रणांशी हवामान विभागाचा समन्वय साधला जातो. मोठा पाऊस येणार असेल तर सर्व यंत्रणा मदतीसाठी तत्पर ठेवल्या जातात.

हॉट लाइन्स-

सरकारी यंत्रणांना हवामानाची माहिती देण्यासाठी इ-मेल, फॅक्स, सोशल मीडिया या साधनांचा वापर केला जातो. कंट्रोल रुम हॉट लाइन्सद्वारे जोडलेले असतात.

हवामान केंद्र-

प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामानविषयक घटकांची अचूक व सद्यस्थितीची माहिती दर दहा मिनिटांनी उपलब्ध होते.

मनुष्यबळाचा वापर-

तापमान, हवेचा वेग, हवेची दिशा, पावसाची नोंद अशा अनेक नोंदी घेण्यासाठी सरफेस ऑर्ब्झव्हेशनचा वापर केला जातो. नोंदी घेण्यासाठी मनुष्यबळाचा वापर केला जातो, हे काम मॅन्युअल असते.

अलर्ट कोणत्या रंगाचे असतात. अर्थ काय असतो?

 १) ग्रीन अलर्ट : संबंधित ठिकाणी कोणताही धोका नाही. सर्व काही ठीक आहे.

 २) यलो अलर्ट :  पुढील काही दिवसांत हवामानाच्या बदलामुळे संकट ओढावू शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी हा अलर्ट जारी केला जातो.

३) ऑरेंज अलर्ट :  नैसर्गिक आपत्तीमुळे येणाऱ्या संकटासाठी  नागरिकांनी तयार राहावे म्हणून हा अलर्ट जारी केला जातो. रेड अलर्ट  नैसर्गिक आपत्ती ओढविल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी हा अलर्ट जारी केला जातो. यामध्ये लोकांनी स्वत:ला आणि इतरांना सुरक्षित ठेवावे.

वेधशाळांचे अपडेट-

१) मुंबईत ऑटोमॅटिक वेदर स्टेशन असल्याने तासागणिक पावसाची आकडेवारी अपडेट होते.

२) सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन वेधशाळा असल्याने २४ तासांनी पावसाचे आकडे अपडेट केले जातात.

३) ॲपद्वारे दर पंधरा मिनिटांनी मुंबईतील पावसाची आकडेवारी ऑटोमॅटिक अपडेट होत राहते. जे नकाशाद्वारे लक्षात येते.

४) दोन्ही वेधशाळांचे अपडेट दर तीन तासांनी घेतले जातात. पण, ते २४ तासांनी उपलब्ध करून दिले जातात.

डॉप्लरचा पल्ला कुठपर्यंत?

१) मुंबईतल्या डॉप्लरमुळे कोल्हापूरसह सांगली, नाशिकसह अहमदनगरपर्यंत अंदाज देता येतो.

२) नागपूरच्या डॉप्लरमुळे परभणीपर्यंत अंदाज देता येतो.

३) गोव्याच्या डॉप्लरच्या मदतीने दक्षिण कोकणातील अंदाज बांधता येतो.

४) हैदराबादमधील डॉप्लरच्या मदतीने मराठवाड्यातील अंदाज बांधता येतो.

डॉप्लर रडार काय करतात?

१) मुंबईत २ डॉप्लर रडार

२) १० मिनिटांनी हवामानाची माहिती देतात.

३) कोणते ढग, किती पाऊस देणार आहेत, याची माहिती मिळते.

४) ३ तासांत कुठे आणि किती पावसाची शक्यता आहे ? हे समजते.

Web Title: in mumbai weather forecast by imd during monsoon jokes on social media by users after the guess is wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.