Join us  

पश्चिम रेल्वेचे ‘गो ग्रीन’; मुंबई सेंट्रल परिसरात ५० ठिकाणी सौर पॅनेल, ३.३३ कोटींची बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 9:55 AM

पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल स्थानक परिसरात ५० ठिकाणी १३.०८ मेगावॉट क्षमतेचे सौर पॅनेल बसविले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :पश्चिम रेल्वेनेमुंबई सेंट्रल स्थानक परिसरात ५० ठिकाणी १३.०८ मेगावॉट क्षमतेचे सौर पॅनेल बसविले आहेत. यासोबतच वडोदरा विभागातील ३५, रतलाम विभागातील ६०, अहमदाबाद विभागातील १६, राजकोट विभागातील ३४ आणि भावनगर विभागातील ३४ एकूण २९९ ठिकाणी सौर पॅनेल बसविले आहेत.  भारतीय रेल्वेच्या  २०३० पर्यंत ‘नेट झिरो कार्बन एमिटर’चे लक्ष्य साध्य करण्यासाठी पश्चिम रेल्वेने हा प्रकल्प राबविला आहे. सौरऊर्जेचा वापर वाढविण्यास सुरुवात केली आहे. 

ऑगस्ट महिन्यापर्यंत पश्चिम रेल्वेच्या सर्व सहा विभागांमधल्या १३६ स्थानकांवर आणि ९३ कार्यालयीन इमारतींवर अशा  एकूण २२९ ठिकाणी हे सौर पॅनेल बसविले आहेत. पश्चिम रेल्वेने हरित ऊर्जा स्त्रोतांचा भाग म्हणून सौर वॉटर हिटर, सौर पथदिवे, एलसी गेट्सवर सौर पॅनेल उपलब्ध करून दिले आहेत. याव्यतिरिक्त, कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचे राष्ट्राचे ध्येय साध्य करण्यासाठी पश्चिम रेल्वे सर्व इमारतींमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सौर यंत्रे बसविण्याची योजना आखत आहे. 

३.३३ कोटींची बचत-

१) पश्चिम रेल्वेच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात सुमारे १२.३६ दशलक्ष युनिट वीज निर्माण केली आहे. ज्यामुळे ९,८८८ टनांपेक्षा जास्त कार्बन फूटप्रिंट कमी झाले. एकूण ६.४३  कोटी रुपयांची बचत झाली आहे.  

२) चालू आर्थिक वर्षामध्ये (ऑगस्टपर्यंत) ५.८२ दशलक्ष युनिट सौरऊर्जा निर्मिती केली आहे, जी ४,६५५ टनांपेक्षा जास्त कार्बन फूटप्रिंट कमी करण्याइतकी आहे. यावर्षी पश्चिम रेल्वेचे  एकूण ३.३३ कोटींची बचत झाली आहे.

टॅग्स :मुंबईपश्चिम रेल्वेसूर्यग्रहण