वेस्टर्न पावसाळ्यात सुपर फास्ट धावणार ! लोकल सेवा बंद पडू नये म्हणून पश्चिम रेल्वे सज्ज 

By सचिन लुंगसे | Published: June 7, 2024 05:02 PM2024-06-07T17:02:03+5:302024-06-07T17:02:27+5:30

ऐन पावसाळ्यात रुळांवर पाणी साचून किंवा तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा बंद पडू नये म्हणून पश्चिम रेल्वे सज्ज झाली आहे.

in mumbai western railway run super fast in the this monsoon ready to avoid local service closure | वेस्टर्न पावसाळ्यात सुपर फास्ट धावणार ! लोकल सेवा बंद पडू नये म्हणून पश्चिम रेल्वे सज्ज 

वेस्टर्न पावसाळ्यात सुपर फास्ट धावणार ! लोकल सेवा बंद पडू नये म्हणून पश्चिम रेल्वे सज्ज 

मुंबई : ऐन पावसाळ्यात रुळांवर पाणी साचून किंवा तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा बंद पडू नये म्हणून पश्चिम रेल्वे सज्ज झाली आहे. पावसाळ्याशी बहुतांशी कामे पुर्ण झाली असून, उर्वरित कामे पुर्ण होत असल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे. विशेषत: ट्रॅकच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घातली जाणार असून, हवामानाशी संबधित माहिती मिळविण्यासाठी हवामान खात्यासोबत महापालिकेच्या यंत्रणांशी समन्वय राखला जाईल, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

कल्व्हर्ट, नाले आणि नाल्यांची साफसफाई आणि गाळ काढणे, रुळांच्या बाजूने घाण आणि कचरा साफ करणे, अतिरिक्त जलमार्ग बांधणे, उच्च क्षमतेच्या पंपांची तरतूद करणे, झाडांची छाटणी करणे इत्यादी कामे मिशन मोडवर पूर्ण होत आहेत.- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

१.५० लाख घनमीटर मलबा हटवण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे काम खास तयार केलेल्या डेब्रिज स्पेशल गाड्या, बीआरएन, जेसीबी, पोकलेनच्या मदतीने करण्यात आले. कल्व्हर्ट आणि नाल्यांच्या साफसफाईचे काम वेगाने पूर्ण होत आहे. यार्डातील पाण्याच्या प्रवाहाच्या पद्धतीचा अभ्यास करून पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी नवीन नाले बांधण्यात येत आहेत.

वांद्रे आणि बोरिवली येथील कल्व्हर्टची स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी डी-स्लडिंग मशीनचा वापर करण्यात आला. प्रभादेवी-दादर सेक्शन, दादर-माटुंगा रोड सेक्शन, वांद्रे टर्मिनस यार्ड, गोरेगाव-मालाड सेक्शन, बोरिवलीत पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी १२०० किंवा १८०० मिमी व्यासाचे १५ पाइप बसवण्यात आले. पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी ११ ठिकाणी नाले बांधले जात आहेत.

१) कल्व्हर्ट आणि नाल्यांमधील चोक पॉइंट्सचे निरीक्षण, स्वच्छता आणि ओळखण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण केले जात आहे.

२) बोरिवली, विरार विभागातील नाल्यांच्या सफाईसाठी ड्रोन सर्वेक्षण आणि देखरेखीचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल.

३) पूरप्रवण ठिकाणी १०० उच्च क्षमतेचे जलपंप बसवण्याचे प्रस्तावित आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १० टक्के अधिक आहे.

४) ४ जल पातळी निरीक्षण उपकरणे बसविण्यात आली आहेत.

५)  ३६ ठिकाणी पूर मापक आहेत.

६)  झाडांच्या छाटणीचे काम सुरू आहे.

७) सर्व रेकची तपासणी केली जात आहे. 

Web Title: in mumbai western railway run super fast in the this monsoon ready to avoid local service closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.