सुंदरीची फ्रेंड रिक्वेस्ट पडली २१ लाखांना; तरुणाला अडकवले सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 10:36 AM2024-08-26T10:36:07+5:302024-08-26T10:39:27+5:30

प्रोफाइलवरील सुंदर मुलीचा फोटो बघून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे माहीममधील एका उच्च शिक्षित तरुणाला भलतेच महागात पडले आहे.

in mumbai women friend request fell to 21 lakh the young man was caught in the trap incident happen in mahim | सुंदरीची फ्रेंड रिक्वेस्ट पडली २१ लाखांना; तरुणाला अडकवले सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात

सुंदरीची फ्रेंड रिक्वेस्ट पडली २१ लाखांना; तरुणाला अडकवले सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: प्रोफाइलवरील सुंदर मुलीचा फोटो बघून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे माहीममधील एका उच्च शिक्षित तरुणाला भलतेच महागात पडले आहे. सायबर गुन्हेगारांच्या टोळीने या तरुणाला सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडून २१ लाख ३९ हजार रुपये उकळले आहेत. बैंक खाते रिकामे होताच त्याने सायबर पोलिसात तक्रार नोंदवली.

माहीम परिसरातील रहिवासी असलेले ४० वर्षीय तक्रारदार एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रोग्रामर पदावर नोकरीस आहेत. १६ जूनच्या रात्री त्यांना व्हॉट्सअॅपवर एका लिंकद्वारे पूनम शर्मा नावाच्या महिलेची फ्रेंडरिक्वेस्ट आली. सुंदर मुलीचा फोटो बघून त्यांनी ती रिक्वेस्ट स्वीकारली, पूनमने काही वेळातच त्यांच्याशी व्हॉट्सअॅपवर चॅटींग करण्यास सुरुवात केली, तिने दिल्लीमधील एका शाळेत शिक्षिका असल्याची बतावणी करत व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल केला कॉल उचलताच विवस्त्र होत असलेली महिला त्यांना दिसली. त्यामुळे त्यांनी घाबरून तो कॉल कट केला. त्यानंतर पूनमने अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचे सांगत तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

तक्रारदाराला त्यानंतर दिल्लीतील सायबर क्राइम अँचमधून आयपीएस अधिकारी दिनेश कुमार बोलत असल्याची बतावणी करणारा कॉल आला. त्याने अश्लील व्हिडीओ व

... असे उकळले पैसे

१) पंकज सिंगला तक्रारदाराने कॉल केला असता, त्याने व्हिडीओ डिलीट करण्याच्या शुल्कापोटी २१ हत्तार ५०० रुपये घेतले. ही रक्कम भरल्यानंतर त्यांच्याकडून आणखी रक्कम उकळण्यास सुरुवात झाली. 

२) सीआयडीच्या नावाचे खोटे पत्र, पूनमने आत्महत्या केली असून, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोडमध्ये तरुणाचे नाव लिहिले आहे. गुन्हा दाखल होऊन अटक न करणे, अशी वेगवेगळी कारणे देऊन १४ जुलैपर्यंत एकूण २१ लाख ३९ हजार ५०० रुपये उकळले.

३) पैशांची मागणी वाढतच असल्याने तक्रारदाराला धक्का बसला. त्यांनी तत्काळ १९३० सायश्चर हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवत मध्य सायबर पोलिस ठाणे गाठून पूनम शर्मा, दिनेश कुमार, पंकज सिंग यांच्याविरोधात तक्रार दिली.

४) फोटो व्हायरल झाल्यास गुन्हा दाखल होऊन अटक केली जाईल, अशी भीती घातली. दिनेश कुमारने व्हिडीओ व फोटो डिलीट करण्यासाठी दिल्ली मीडिया म्हणून पंकज सिंग याचा मोबाइल नंबर देऊन त्याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.

Web Title: in mumbai women friend request fell to 21 lakh the young man was caught in the trap incident happen in mahim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.