Join us

पुढील वर्षी पाच मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत, प्रवास जलद आणि सुखकर होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 10:22 AM

३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे; प्रवास जलद आणि सुखकर होण्यास मिळणार मदत.

मुंबई :मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मुंबई महानगरात सुमारे ३३७ किमी लांबीचे मेट्रो मार्गिकेचे जाळे उभारले जात आहे. सद्य:स्थितीत मुंबईतील ३ मेट्रो मार्गिका सुरू आहेत, तर ९ मेट्रो मार्गिकांच्या उभारणीचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी कल्याण-भिवंडी-तळोजा मेट्रो १२ मार्गिकेचे भूमिपूजन केले. त्यामुळे या मेट्रो मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामाला येत्या काही महिन्यांत सुरुवात होईल. त्याचबरोबर आणखी दोन मेट्रो मार्गिकाही प्रस्तावित आहेत. त्या मार्गिकांमुळे मुंबई महानगरातील मेट्रो मार्गिकांचे जाळे विस्तारणार असून, प्रवास जलद आणि सुखकर होण्यास मदत मिळणार आहे. 

प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या मार्गिका - 

मेट्रो १ - वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो १ मार्गिका पूर्व पश्चिम उपनगरांना जोडते. 

लांबी - ११.४० किमीस्थानके - १२ कधी सुरू झाली - जून २०१४ खर्च - २,३५६ कोटी रु. प्रवासी - सुमारे ४.५ लाख

मेट्रो २ अ - डी. एन. नगर ते दहीसर पूर्व मेट्रो २अ मार्गिका मेट्रो २ बी आणि मेट्रो ९ मार्गिकेशी जोडली जाणार आहे. पश्चिम उपनगरातील प्रवास जलद होण्यास मदत.

लांबी - १८.६ किमीस्थानके - १७ कधी सुरू झाली - एप्रिल २०२२ खर्च - ६४१० 

मेट्रो २ ब - डीएन नगर येथील ईएसआयसी वसाहत ते मंडाले मेट्रो २ब मार्गिका ही मेट्रो २ अ मार्गिकेचा विस्तार आहे. मेट्रो २बी मुळे पूर्व उपनगरांची आणि थेट दहिसरपर्यंत जोड मिळणार आहे. 

लांबी - २३.६ किमी.स्थानके - २२ खर्च - १०,९८६ कोटी रु. प्रकल्पाची सद्य:स्थिती - सुमारे ६३ टक्केप्रकल्प पूर्णत्वाची मुदत - जून २०२५ 

मेट्रो ३ - मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो ३ ही मार्गिका आरे ते कुलाबा अशी धावेल. या मेट्रो मार्गिकेमुळे पश्चिम उपनगराला थेट कुलाबा आणि भविष्यात नेव्हीनगरपर्यंत जोडणी मिळेल. मुंबईला पश्चिमेकडून उत्तर-दक्षिण जोडणारी ही महत्त्वाची मार्गिका असेल.

लांबी - ३३.५० किमीस्थानके - २७ खर्च - ३७ हजार कोटी रु. प्रकल्पाची सद्य:स्थिती - सुमारे ८९ टक्के कामे पूर्ण (जानेवारी अखेरपर्यंत) डेडलाईन - पहिला टप्पा जून २०२४ पर्यंत सुरू होण्याची शक्यता

मेट्रो ४ अ - कासारवडवली ते गायमुख मेट्रो ४ अ मार्गिका मेट्रो ४ चा विस्तार असेल.

लांबी २.७  किमीस्थानके - २खर्च - ९४९ कोटी रुपयेप्रकल्पाची सद्य:स्थिती - ६७ टक्के डेडलाईन - जून २०२५ 

मेट्रो ५ - ठाणे, भिवंडी आणि कल्याण भागाला जोडणी देण्यासाठी मेट्रो ५ मार्गिका महत्त्वपूर्ण आहे. स्थानके - १५ खर्च - ८४१६ कोटी रुपयेप्रकल्पाची सद्य:स्थिती - ८५ टक्के काम पूर्ण

मेट्रो ६ - स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो ६ मार्गिका पूर्व आणि पश्चिम उपनगराला थेट जोडणी देणार आहे. जेव्हीएलआरवरून ही मेट्रो धावेल. त्यातून या भागातील कोंडी काहीशी सुटेल.

लांबी - १५.३१ किमीस्थानके - १३ खर्च - ६,७१६ कोटी रुपयेप्रकल्पाची सद्य:स्थिती - ७६ टक्केडेडलाईन - जून २०२६ 

मेट्रो ७ अ- मेट्रो ७ ला पुढे विमानतळाशी जोडण्यासाठी ही मेट्रो महत्त्वपूर्ण आहे. विमानतळ वसाहत ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ‘मेट्रो ७ अ’ ही मार्गिका असेल. 

लांबी - ४ किमीस्थानके - २प्रकल्पाची सद्य:स्थिती - ३० टक्के काम पूर्णडेडलाईन - डिसेंबर २०२५ 

मेट्रो ९- दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेमुळे मीराभाईंदरपासून प्रवाशांना थेट विमानतळापर्यंत पोहोचता येणार आहे. 

लांबी - १६ किमीस्थानके - ८खर्च  ६६०७ कोटी रुपयेप्रकल्पाची सद्य:स्थिती - ८५ टक्केडेडलाईन - पहिल्या टप्पा - जून २०२५  

भविष्यात येऊ घातलेले प्रकल्प :

मेट्रो १० - गायमुख ते मीरा रोड मेट्रो १० मार्गिकेची मेट्रो ४ आणि मेट्रो ९ मार्गिकांना जोडणी मिळणार आहे. त्यातून ठाण्यातील व्यक्ती थेट मीरा भाईंदरला मेट्रोने पोहोचू शकणार आहे. 

लांबी - ९.२ किमीस्थानके - ४खर्च - ४४७६ कोटी (अपेक्षित) 

मेट्रो ११ - सीएसएमटी ते वडाळा मेट्रो ११ ही मेट्रो ४ चा विस्तार असेल. या मेट्रोमुळे सीएसएमटीहून निघालेल्या प्रवाशांना थेट ठाण्यापर्यंत जाता येईल.

लांबी - १६ किमीस्थानके - १० खर्च १६ हजार कोटी रुपयेडेडलाईन - प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत

मेट्रो १२ - कल्याण ते तळोजा मेट्रो १२ मार्गिकेचे भूमिपूजन झाले. येत्या काही महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार.

लांबी - २२.१७ किमीस्थानके - १९ खर्च ५,८६५ कोटी रुपयेडेडलाईन - डिसेंबर २०२७  

टॅग्स :मुंबईमेट्रोएमएमआरडीए