लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ताडदेव येथील दुर्घटना झालेल्या इमारतीच्या शेजारी भाटिया रुग्णालय असल्याने प्रथम बहुतेक जखमींना भाटियामध्ये नेण्यात आले होते. काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वोकहार्ड व रिलायन्स या रुग्णालयांमध्ये नेण्यात आले; परंतु तेथे त्यांना दाखल करून घेण्यास तेथील प्रशासनाने नकार दिल्याने पुन्हा त्या जखमींना इतरत्र हलवण्यात आले; मात्र या रुग्णालय प्रशासनांनी याविषयी नेमकी भूमिका स्पष्ट केलेली नाही.
अजून किती निष्पाप मृत्यू हवे..?
जवळच्या खाजगी हॉस्पिटलनी रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला. हे ऐकून प्रचंड धक्का बसला. संतापही आला आहे. यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले. तर तो दोष हॉस्पिटलचा असेल. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
या आगीच्या दुर्घटनेला महापालिका जबाबदार आहे. असे किती निष्पाप मृत्यू महापालिकेला हवे आहेत. अग्निरोधक यंत्रणा किती सक्षम आहे, हे तपासण्याची जबाबदारी कोणाची आहे? महापालिका, पोलीस, अग्निशमन दल, बेस्ट या यंत्रणांशी समन्वय साधणारी यंत्रणा आपल्याकडे अस्तित्वात आहे का? - प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते