नवतपात भर दुपारी मुंबईतील मंत्र्यांच्या बंगल्यांची बत्ती गुल; डीपीमध्ये झाला तांत्रिक बिघाड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 12:14 PM2024-06-01T12:14:34+5:302024-06-01T12:17:19+5:30
मंत्रीमहोदय मुक्कामी नव्हते पण कर्मचारी झाले घामाघूम
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील ग्रामीण भागासह काही शहरांमध्ये वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत असताना शुक्रवारी दुपारी मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यातील वीज पुरवठा काही वेळासाठी खंडीत झाला होता. लोकसभेची आचारसंहिता असल्यामुळे एकही मंत्री बंगल्यात मुक्कामाला नाहीत. पण याचा फटका बंगल्यातील कर्मचाऱ्यांना बसला. चोवीस तास गारेगार वातावरणात वावरणारे हे कर्मचारी घामाघूम झाले होते. राज्याच्या कारभार पाहणाऱ्या मंत्र्यांची मलबार हील, वाळकेश्वर आणि मंत्रालयासमोर शासकीय निवासस्थाने आहेत.
दुपारी तीन वाजले आणि...
- त्यापैकी मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानांसमोरील डीपीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या भागातील वीज पुरवठा दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त काळ खंडीत झाला होता.
- या डीपीतून अतुल सावे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, डॉ. तानाजी सावंत, अदिती तटकरे, दादा भुसे, रवींद्र चव्हाण, शंभूराज देसाई, बाळासाहेब भवन, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवर यांच्या निवासस्थानांना वीजपुरवठा होतो.