मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तयारी करण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी ९०० पोलीस अधिकाऱ्यांसह साडे चार पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. तसेच, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही पोलिसांडून करण्यात आले आहे. याशिवाय, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच कार्यक्रम स्थळाकडे जाणान्या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, १९ जानेवारी रोजी दुपारी १६.३० वा. ते सायंकाळी साडे सहा दरम्यान वाहतूक व्यवस्थेत बदल.
या मार्गावर प्रवेश बंदी
- पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलीक कडून बिकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणान्या सर्व वाहनांना फॅमीली कोर्ट जंक्शन कडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेश बंदी राहणार आहे.
- संत ज्ञानेश्वर मार्गावरून कुर्लाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना इन्कम टॅक्स जंक्शन कडून पुढे बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेश बंदी
- खेरवाड़ी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगर कडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेश बंदी
- सुर्वे जंक्शन व रजाक जंक्शन वरुन बिकेसी परिसर, धारावी, वरळी सिलीकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना एमटीएनएल जंक्शन येथुन प्रवेश बंदी.
- संपुर्ण बीकेसी परिसरामध्ये कोणीही त्यांची वाहने कोणत्याही रस्त्यांवर पार्किंग करणार नाहीत.
पर्यायी मार्ग
- पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सि.लीक कडून बिकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणारी वाहने एमएमआरडीए जंक्शन येथुन धारावी टि जंक्शन वरून कुर्ला कडे तसेच पूर्व दृतगती मार्गाकडे मार्गस्थ होतील.
- संत ज्ञानेश्वर मार्गावरुन इन्कम टॅक्स जंक्शन कडून पुढे बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने
- गुरुनानक हॉस्पीटल जवळ जगत विद्यामंदिर जंक्शन येथुन कलानगर मार्गे सरळ पुढे धारावी टि जंक्शनवरून
- पुढे कुर्ला कडे मार्गस्थ होतील. खेरवाडी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगर कडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने, वाल्मीकी नगर येथुन युटर्न घेवून (खेरवाडी वा. वि. हद्दीत ) शासकीय वसाहत मार्गे कलानगर जंक्शन येथुन सरळ पुढे धारावी या. वि. हद्दीत ) टि जंक्शन पुढे वरून कुर्ला कडे मार्गस्थ होतील.
- सुर्वे जंक्शन व रजाक जंक्शन वरुन पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलीकच्या दिशेने जाणारी वाहने सुर्वे जंक्शन, रजाक जंक्शन, एमटीएनएल जंक्शन येथुन सिएसटी रोडने मुंबई विद्यापीठ मेनगेट, आंबेडकर जंक्शन, हंसभुग्रा जंक्शन येथुन पुढे इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.
- पूर्व द्रुतगती महामार्ग, चुनाभट्टीवरून, कनेक्टर मार्गे येणारी वाहने एनएसई जंक्शन, इन्कमटॅक्स जंक्शन, फॅमीली कोर्ट, एमएमआरडीए वरून पुढे मार्गस्थ होतील.
अवजड वाहनांना बंदी१९ जानेवारी रोजी दुपारी १२.०० ते रात्रौ २१.०० वा. पर्यत पश्चिम उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्ग व सर्व रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. यामधून रुग्णवाहिका, शाळेच्या बसेस व इतर बसेस यांना वगळण्यात येत आहे.