स्वातंत्र्याच्या लढाईत ‘चले जाव’ची सुरुवात मुंबईतूनच झाली होती - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 07:14 AM2023-08-31T07:14:39+5:302023-08-31T07:14:51+5:30

ज्या क्षणी आमचे सरकार केंद्रात आणि राज्यात येईल, तेव्हा आम्ही यांचे डाव हाणून पाडू. ‘इंडिया’ जसजसे पुढे जाईल तसे सरकार सिलिंडर फ्री देईल, असेही ठाकरे म्हणाले.

In the freedom struggle, 'Chale Jaav' started from Mumbai itself - Uddhav Thackeray | स्वातंत्र्याच्या लढाईत ‘चले जाव’ची सुरुवात मुंबईतूनच झाली होती - उद्धव ठाकरे

स्वातंत्र्याच्या लढाईत ‘चले जाव’ची सुरुवात मुंबईतूनच झाली होती - उद्धव ठाकरे

googlenewsNext

मुंबई : आमची विचारधारा वेगळी असली तरी संविधानाचे रक्षण करणे हे एकमेव उद्दिष्ट आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत ‘चले जाव’ची सुरुवात मुंबईतूनच झाली होती. ब्रिटिशही विकास करतच होते; पण त्यांच्याविरोधात पूर्ण ताकद रस्त्यावर उतरली. आम्हाला विकास हवाय, पण त्याचसोबत स्वातंत्र्यही हवे. विकासापेक्षा स्वातंत्र्य मोठे आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

हाच धागा पुढे नेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशात हुकूमशाहीविरोधात लढण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले आहेत, ‘इंडिया’सोबत देश परिवर्तनासाठी आम्ही तयार आहाेत, अशी भूमिका स्पष्ट केली. निती आयोगाच्या बैठकीविषयी बोलताना ठाकरे म्हणाले, मुंबई वेगळे करणे किंवा केंद्रशासित करणे हा डाव उघड झाला आहे. ज्या क्षणी आमचे सरकार केंद्रात आणि राज्यात येईल, तेव्हा आम्ही यांचे डाव हाणून पाडू. ‘इंडिया’ जसजसे पुढे जाईल तसे सरकार सिलिंडर फ्री देईल, असेही ठाकरे म्हणाले.

‘उद्या जातो अन् शपथच घेताे’
इंडिया आघाडीच्याउद्धव ठाकरेंना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करावे अशी मागणी होत आहे, असा प्रश्न करण्यात आला. त्यावर त्यांनी ‘हो, बरोबर, उद्या जातो, शपथ घेतो,’ अशी मिस्कील प्रतिक्रिया दिली. 

देशासमोर वस्तुस्थिती ठेवा : पवार
पंतप्रधानांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराची टीका केली, त्यात सिंचन घोटाळा, बँकेतील गैरव्यवहार यांचा उल्लेख केला. पंतप्रधानांकडे माहिती असेल तर त्यांनी चौकशी करावी आणि देशासमोर वस्तुस्थिती ठेवावी, असे आव्हान शरद पवार यांनी दिले.

आम्ही आमचे काम करणे थांबवायचे का? 
शिवसेनेच्या मुखपत्रातून होणाऱ्या  टीकेबाबत शरद पवार म्हणाले, ‘तुम्ही तुमच्या मीडियातून टीका केली म्हणून आम्ही आमचे काम करणे थांबवायचे का? तुम्ही तुमचे काम करा, आम्ही आमचे काम करतो.’ 

Web Title: In the freedom struggle, 'Chale Jaav' started from Mumbai itself - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.