मुंबई : वाढती धूळ, रेडीमिक्स काँक्रीट प्लांटमुळे होणारे प्रदूषण, बांधकामातून उठणारी धूळ आणि रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांतून बाहेर पडणाऱ्या वायुप्रदूषणाने संपूर्ण नोव्हेंबर हवेत जिरला आहे. नोव्हेंबर महिन्यातील ३० दिवसांपैकी ३० दिवस प्रदूषित नोंदविण्यात आले आहेत. डिसेंबर महिन्यातील पहिल्याच दिवशी मुंबई धुक्यात हरविल्याचे चित्र होते. मुंबईमध्ये हिवाळ्यात प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहे.
ऑक्टोबरपेक्षा नोव्हेंबरमध्ये फटाके आणि इतर अनेक घटकांमुळे येथे प्रदूषणात पुन्हा वाढ झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून लक्षात येते. कल्याण, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, विरार, मीरा भाइंदर, भिवंडी येथे वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रे आहेत. त्या केंद्राची केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेली आकडेवारी नागरिकांना धडकी भरविणारी आहे.
सायन-मुंबई-
०-५० निर्देशांक चांगला मनाला जातो. परंतु, येथे असा एकही दिवस नव्हता. ५१-१०० समाधानकारक असा निर्देशांकसुद्धा केवळ ३ दिवस होता. १०१-२०० निर्देशांक असलेले १९ दिवस प्रदूषित होते. २०१-३०० निर्देशांक असलेले जास्त प्रदूषणाचे ८ दिवस आढळले. अतिशय प्रदूषणाचे दिवस आढळले नाही.
विरार-
चांगला निर्देशांक १ दिवस समाधानकारक निर्देशांक ३ दिवस साधारण प्रदूषण २३ दिवस अधिकचे प्रदूषण ३ दिवस
०- ५० : निर्देशांक आरोग्यासाठी चांगला ५१-१०० : निर्देशांक हा समाधानकारक प्रदूषण, परंतु आजारी लोकांना अपायकारक १०१-२०० : निर्देशांक सर्वसाधारण प्रदूषित श्रेणीत येत असून सर्वांनाच आरोग्यासाठी धोकादायक आहे. २०१-३०० : निर्देशांक असून जास्त प्रदूषित आणि आरोग्यासाठी धोकादायक मानला जातो. ३०१-४०० : निर्देशांक हा अतिप्रदूषित आणि सर्व नागरिकांना धोकादायक मानला जातो. ४०१-५०० : निर्देशांक हे अतिशय धोकादायक प्रदूषण मानले जाते.खडकपाडा-कल्याण ०-५० निर्देशांक चांगला मानला जातो. परंतु, येथे केवळ १ दिवस निर्देशांक चांगला आढळला. ५१-१०० समाधानकारक असा निर्देशांक असलेले दिवस ७ होते. १०१-२०० निर्देशांक असलेले २० दिवस प्रदूषित होते. २०१-३०० निर्देशांक असलेले जास्त प्रदूषणाचे दोन दिवस आढळले. ३०१-४०० निर्देशांक असलेले अतिशय प्रदूषणाचे दिवस आढळले नाही.
धूलिकण २.५ चे प्रमाण अधिक; आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक :
मीरा भाईंदर-
चांगला निर्देशांक ० दिवस समाधानकारक निर्देशांक ४ दिवस साधारण प्रदूषण २० दिवस अधिकचे प्रदूषण ६ दिवस
उपवन-ठाणे-
०-५० निर्देशांक चांगला मनाला जातो. परंतु, येथे असा एकही दिवस नव्हता. ५१-१०० समाधानकारक असा निर्देशांक एकही दिवस नव्हता. १०१-२०० निर्देशांक असलेले २६ दिवस प्रदू-षित आढळले. २०१-३०० निर्देशांक असलेले जास्त प्रदूषणाचे ४ दिवस आढळले. ३०१-४०० निर्देशांक असलेले अतिशय प्रदूषणाचे दिवस आढळले नाही.
नोव्हेंबर महिन्याच्या एकूण ३० दिवसांपैकी मुंबईचे बहुतेक सर्व विभाग ३० दिवस प्रदूषित होते. प्रदूषकांमध्ये सूक्ष्म धूलिकण २.५ चे प्रमाण अधिक आहे. हे आरोग्यासाठी धोकादायक आहे, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.